Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

KKR च्या क्रिकेटपटूने हद्दच केली; मॉलमध्येच काढला रणवीर सिंगप्रमाणे Selfie

रणवीर सिंंगनंतर आता केकेआरच्या या क्रिकेटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय

KKR च्या क्रिकेटपटूने हद्दच केली; मॉलमध्येच काढला रणवीर सिंगप्रमाणे Selfie

Andre Russell Nude Selfie : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (ranvir singh) काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूटमुळे (Photoshoot) चर्चेत आला होता. रणवीर सिंगने एका मासिकासाठी हे न्यूड फोटोशूट केले होते. रणवीरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. यानंतर रणवीर सिंगवर टीकाही करण्यात आली. रणवीर विरोधात पोलीस ठाण्यातही तक्रारही दाखल करण्यात आली होती.

आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या आंद्रे रसेलने (Andre Russell) आपल्या सेल्फीने (Selfi) खळबळ उडवून दिली आहे. रसेल फोटमध्ये नग्न अवस्थेत आरशासमोर उभा आहे. एका वॉर्डरोब डिपार्टमेंटमध्ये रसेलने हा न्यूड सेल्फी काढला आहे. यानंतर रसेलने हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवप अपडेट केला आहे. आता हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यासोबत त्याची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत केली जात आहे.

रसेलचा हा फोटो एका वॉर्डरोब डिपार्टमेंटमधील आहे. रसेलने आरशासमोर उभा राहून सेल्फी काढला आहे. त्याने इमोजीच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट लपवला आहे. पण या सेल्फीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. रसेलचा हा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

fallbacks

आंद्रे रसेलच्या या न्यूड सेल्फीवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. व्हायरल झाल्यानंतर हा फोटो काढून टाकण्यात आला आहे. मात्र, तो फोटो वेगवेगळ्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये रसेलची तुलना रणवीर सिंगसोबत केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरनेही आपल्या न्यूड फोटोशूटने खळबळ उडवून दिली होती

Read More