Yash Dayal : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) आता एका नव्या वादात अडकला आहे. यश दयालवर आता जयपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. आयपीएल 2025 दरम्यान यश दयालने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा खुलासा समोर आलाय. या घटनेपूर्वीच एका लैंगिक संबंधांच्या आरोपांवर कारदेशीर कारवाई यश दयालवर सुरु आहे. याआधी गाझियाबादमधील एका महिलेने त्यांच्यावर हे आरोप केले होते.
अलीकडील कारवाईच्या आधारे अलाहाबाद उच्च न्यायालयाने गझियाबाद प्रकरणात यश दयालच्या पोलिस कोठडीला नकार दिल्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता जयपूरचं नवीन प्रकरण समोर आल्याने यश दयालच्या अडचणी आणखी वाढवणार आहेत. एका १७ वर्षीय ल्पवयीन मुलीने यशने तिच्यावर बलात्कारा केल्याचा आरोप केला आहे. दैनिक भास्कर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका अल्पवयीन पीडितेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाच्या आधारे जयपूर येथील संगणर सदर पोलिस स्टेशन येथे यश दयाल यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्ट्सनुसार यश दयालने अल्पवयीन मुलीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुवर्ण भविष्याचे स्वप्न दाखवले आणि दोन वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सांगानेर सदर पोलीस ठाण्याचे SHO अनिल जैमनने सांगितले की, पीडित मुलगी ही क्रिकेटच्या माध्यमातून यश दयालच्या संपर्कात आली होती. असा आरोप केला जातो की जेव्हा पीडित व्यक्ती सुमारे दोन वर्षांपूर्वी लहान होती, तेव्हा यश दयालने क्रिकेट कारकीर्द बनविण्यात मदत करण्याचे नाटक करून दोन वर्षे वारंवार बलात्कार केला. अहवालात आयपीएल 2025 शी संबंधित असल्याचेही नमूद केले आहे.
जयपूर पोलिसांच्या सांगण्यानुसार यश दयाल जेव्हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना खेळण्यासाठी जयपूरमध्ये आला होता तेव्हा त्याने पीडित मुलीला सीतापूर जवळील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. खूप काळ गप्प राहणं, इमोशनल ब्लॅकमेल आणि शारीरिक आणि मानसिक छळानंतर पीडितेने 23 जुलै 2025 रोजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जयपूर पोलिसांच्या माहितीनुसार जेव्हा बलात्काराची पहिली घटना जेव्हा घडली तेव्हा पीडित मुलगी १७ वर्षांची होती. त्यामुळे यश दयालवर POCSO कायद्या 2012 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. जर यात यश दयाल दोषी आढळल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. POCSO कायद्या 2012 अंतर्गत जर यशवरील आरोप सिद्ध झाले तर त्याला भरपूर वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.