Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फेमस फुटबॉलरची गर्लफ्रेन्डला ''नेट''वर फॅन्सने धुतलं...कोण आहे ती वाचा?

एरिका आणि ग्रीजमन यांची 2011 मध्ये भेट झाली आणि तेव्हापासून ते दोघेही एकमेकांना डेटिंग करत आहेत.

फेमस फुटबॉलरची गर्लफ्रेन्डला ''नेट''वर फॅन्सने धुतलं...कोण आहे ती वाचा?

मुंबई : फ्रेंच स्टार खेळाडू एंटोनियो ग्रीजमन हे फुटबॉल जगातील एक नामांकित नाव आहे. एंटोनियो ग्रीजमन हा आपल्या राष्ट्रीय संघा व्यतिरिक्त स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाकडून देखील खेळतो. सध्या तो आपल्या राष्ट्रीय संघासह युरो चषक 2020 खेळण्यात व्यस्त आहे. त्याने 2018 मध्ये फूटबॉल वर्ल्ड कपदेखील जिंकला आहे. ग्रीजमनच्या करिअरच्या संपूर्ण प्रवासात त्याला ज्या व्यक्तीने सर्वात जास्त सपोर्ट केला, ती म्हणजे त्यांची पत्नी एरिका चोपेरिना.

एरिका आणि ग्रीजमन यांची 2011 मध्ये भेट झाली आणि तेव्हापासून ते दोघेही एकमेकांना डेटिंग करत आहेत. परंतु या दोघांनी याबद्दल 2012 मध्ये मीडियामध्ये सांगितले. यानंतर 2017 मध्ये या दोघांनी लग्न केले. आता या दोघांनाही दोन मुली आहेत.

fallbacks

जरी एरिका ग्रीजमनची पत्नी म्हणून ओळखली जात असली, तरी तिची स्वत: ची एक वेगळी ओळख आहे. ती एक बाल मानसशास्त्रज्ञ आहे. ती मुळची स्पेनची आहे आणि सॅन सेबॅस्टियन युनिव्हर्सिटीमधून मनोविज्ञान विषयात तिने शिक्षण घेतले आहे.

याशिवाय एरिका एक इन्स्टाग्राम स्टार आहे. ज्यामुळे तिने अनेक प्रसिद्ध ब्रँडशी करार केला आहे. त्यामुळे ती बऱ्याच ब्रँडचे प्रमोशन करते. एरिकाचे इन्स्टाग्रामवर 335k फॉलोअर्स आहेत.

fallbacks

एका मीडिया अहवालानुसार, ती कोरडियालमेंटे एरिका नावाचा एक ब्युटी ब्लॉग चालवत होती. परंतु ग्रीजमनबरोबर लग्नानंतर तिला हा ब्लॉग बंद करावा लागला, कारण त्यामुळे तिची लोकप्रियता इतकी वाढली की, ती जिथे जाईल तिथे फॅन्स तिला घेरायचे. गर्दी करायचे आणि मेल, मॅसेज करायचे. ज्यामुळे ती खूप हैरान झाली आणि तिला आपले काम सोडावे लागले. परंतु अजूनही ती काही ब्रँडची एम्बेसिडर आहे.

Read More