Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाहा Viral Kohli नं टी20 चं कर्णधारपद सोडताच काय होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया

पाहा अनुष्का त्यावेळी नेमकी कशी व्यक्त झाली.   

पाहा Viral Kohli नं टी20 चं कर्णधारपद सोडताच काय होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं गुरुवारी थेट टी20 संघाचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि सर्वांनाच हादरा बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटनं हे वृत्त सर्वांपर्यंत पोहोचवलं. ज्यानंतर याच सोशल मीडियावर विराटच्या या निर्णय़ाबाबत क्रीडारसिक व्यक्त होऊ लागले. अनुष्कालाही आपल्या पतीचा म्हणजेच विराटचा हा निर्णय समजल्यानंत तिनंही यावर प्रतिक्रिया दिली. 

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराटनं लिहिलेलं पत्र पोस्ट करत तिनं त्यावर हार्टशेप इमोजी लावला. जणू काही विराटला त्याच्या प्रत्येत निर्णयात आपण कुठूनही साथ देऊ असाच संदेश तिनं या माध्यमातून दिला. 

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक सामन्यांच्या नंतर आप भारतीय संघाच्या टी 20 संघाचं कर्णधारपद सोडेन असं त्यानं पत्रात म्हटलं आहे. विराटच्या या पोस्टवर अनेकजण व्यक्त झाले. अनेकांनी त्यानं हा निर्णय योग्य वेळी घेतल्याचं म्हटलं. फलंदाज म्हणून विराटला आणखी उत्तमोत्तम कामगिरी करताना पाहायचंय अशी इच्छा आणि सकारात्मक संदेश सर्वांनीच विराटला दिला. 

fallbacks

2017 मध्ये अनुष्का आणि विराट यांनी विवाहबंधनात अडकत सहजीवनास सुरुवात केली. ज्यानंतर किंबहुना लग्नाआधीही अनुष्का आणि विराटनं प्रत्येक लहानमोठ्या निर्णयामध्ये एकमेकांची सा दिली आहे. आताही विराटनं कर्णघारपदाचा त्याग करण्याचा इतका मोठा निर्णय घेतला असतानाच अनुष्का त्याचा आधार होऊन या प्रसंगात त्याच्या सोबत उभी आहे. 

Read More