Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अनुष्कालाही आवडत नाही, नवऱ्याचं ऑफिसला जाणं (दौऱ्यावर असणं), ती म्हणते, 'इंग्लंडमध्ये सध्या मिळाली ही सूट'

या दरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट दिसत नाही पण....

अनुष्कालाही आवडत नाही, नवऱ्याचं ऑफिसला जाणं (दौऱ्यावर असणं), ती म्हणते, 'इंग्लंडमध्ये सध्या मिळाली ही सूट'

लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये आहे. संघाचे बरेच खेळाडू आपल्या कुटूंबियांसह इंग्लंडला पोहोचले आहेत आणि क्वारंटाइन राहून एकत्र वेळ घालवत आहेत. यावेळी खेळाडूंना साऊथॅम्प्टनच्या मैदानाजवळील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले आहे. विराट कोहली देखील आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडला पोहोचला आहे आणि आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवत आहे.

या दरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट दिसत नाही पण, कर्णधाराचे नाव या पोस्टमध्ये दिसले, ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध 18-22 जूनदरम्यान भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू बराच काळ आपल्या देशापासून दूर राहणार आहेत. हेच कारण आहे की, खेळाडू आपल्या कुटुंबियांसह इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत आणि एकत्र वेळ घालवत आहेत.

अनुष्का शर्माचे मजेदार कॅप्शन

जेव्हापासून भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. तेव्हापासून सगळ्यांच्याच फोटोमध्ये या हॉटेलची बाल्कनी दिसत आहे, ज्याच्या पाठिमागे क्रिकेटचे मैदान दिसत आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने ही या बाल्कनीमधील एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्का शर्माने हा फोटो शेअर करताना एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे, 'काही दिवस घरी काम न आणण्याचा नियम याक्षणी विराटला लागू होणार नाही. कारण आम्ही स्टेडियमजवळ क्वारंटाइन आहोत. यापूर्वी विराट कोहलीनेही ट्वीटरवर स्वत: चा एक फोटो शेअर केला होता, ज्यात एजेंस बाउलचे एक सुंदर दृश्य दिसत आहे.

Read More