Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MS Dhoni: धोनी खेळाडूंवर करायचा इमोशनल अत्याचार? सुरेश रैनाने केली पोलखोल, म्हणाला...

Mahendra Singh Dhoni, Indian Team: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांच्यातील गुरू शिष्याचं नातं सर्वांना माहितीच आहे. अशातच याच रैनाने धोनीची पोलखोल केली आहे.

MS Dhoni: धोनी खेळाडूंवर करायचा इमोशनल अत्याचार? सुरेश रैनाने केली पोलखोल, म्हणाला...

Suresh Raina On MS Dhoni: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि मिस्टर आयपीएल नावाने फेमस असलेल्या सुरेश रैना (Suresh Raina) सध्या किक्रेटच्या मैदानापासून लांब असल्याचं दिसून येतंय. महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि रैना यांच्यातील गुरू शिष्याचं नातं सर्वांना माहितीच आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा रैनाने देखील तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. अशातच याच रैनाने धोनीची पोलखोल केली आहे.

काय म्हणाला सुरेश रैना?

नेटमध्ये धोनीची गोलंदाजी सर्वात कठीण असायची. धोनी एका फलंदाजाला एकदा बाद करायचा आणि नंतर बराच वेळ त्याची छेड काढायचा, असं सुरेश रैना म्हणाला आहे. मला वाटतं की मुरलीधरन आणि मलिंगा हे जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज आहेत, पण एमएस धोनी (MS Dhoni) नेटमध्ये होता, असं रैना म्हणतो.

मी माझ्या कारकीर्दीत खेळलेल्या गोलंदाजांपैकी नेट्समधील सर्वात धोकादायक गोलंदाज महेंद्रसिंह धोनी आहे, असं सुरेश रैना म्हणाला आहे.  कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास तो संधी सोडत नसायचा. इंग्लंडमध्ये तो चेंडू चांगल्या प्रकारे स्विंग करू शकतो, असंही रैना म्हणाला आहे.

जर धोनीने तुम्हाला नेटमध्ये आऊट केलं तर, तुम्ही त्याच्यासोबत दीड महिना बसू शकणार नाही. तुम्हाला कसं आऊट केलं याची आठवण सतत धोनी तुम्हाला करून देतो, असं म्हणत रैनाने धोनीची पोलखोल केली आहे. धोनी ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचा, मध्यमगती, लेगस्पिन, सर्वकाही त्याला जमत होतं. नेट्समध्ये धोनीने नो बॉल टाकला तरी तो त्याची मनमानी करायचा. तो बॉल योग्य होता, त्यावर अडून असायचा, असा किस्सा देखील सुरेश रैना सांगतो.

आणखी वाचा - दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्ट दरम्यान मैदानात राडा; बेअरस्टोने उचलून बाहेर फेकलं; पाहा Video

दरम्यान, कुठेही संधी मिळाली तर धोनी बॉलिंग करण्याची संधी सोडायचा नाही. कसोटी सामन्यात बॉलिंग करण्याची त्याची नेहमी इच्छा असायची, असं देखील रैना सांगतो.

काही दिवसांपूर्वी, महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) काही वेळा आपला संयम गमावला आहे. जेव्हा मी गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथमध्ये चूक केली, तेव्हा त्याने मला शिवीगाळ देखील केली आहे, असा खुलासा इशांत शर्मा केला होता. 'कूल तो नहीं हैं, बहुत गाली देते हैं, मुझे भी बहुत दी है', असं म्हणत इशांत शर्माने कॅप्टन कूल टॅग पुसला आहे. 

Read More