Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी

इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर  खेळाडू चहलची माफी मागावी लागली?

अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी

IND vs ENG 1st T20: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसह अभिषेक शर्माची वादळी शैली पाहून भारतीय चाहते खूप खूश झाले. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सामन्यात दोन विकेट घेतल्या.

इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना अवघ्या तीन षटकांत बाद करणाऱ्या अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर अक्षरशः कान धरावे लागले. अर्शदीपने कोणत्या खेळाडूची माफी मागितली आणि त्यामागील कारण काय आहे? अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. 

अर्शदीप आणि वरुण यांनी उत्तम कामगिरी 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या विजयात दोन गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते दोन गोलंदाज म्हणजे अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती. अर्शदीप सिंगने इंग्लिश सलामीवीरांचे कंबरडे मोडले, तर वरुण चक्रवर्तीने इंग्लंड संघाचा मधला क्रम उद्ध्वस्त केला. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 17 धावा देत 2 बळी घेतले.

अर्शदीपने मागितली माफी 

अर्शदीप सिंग हा भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे. अर्शदीपकडे आता या फॉरमॅटमध्ये 97 विकेट्स आहेत. चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. मात्र, चहलचा विक्रम मोडल्यानंतर अर्शदीप सिंगने कॅमेऱ्यासमोर त्याची माफीही मागितली. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला होता.

बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर 

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती एकमेकांचे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, जेव्हा अर्शदीप सिंगच्या ऐतिहासिक कामगिरीची चर्चा झाली तेव्हा डावखुऱ्या गोलंदाजाने सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही अशी कामगिरी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. शेवटी त्याने युजवेंद्र चहलची माफी मागितली आणि युजी भाई, हा विक्रम मोडल्याबद्दल माफी मागितली. 

Read More