Arshdeep Singh Dances: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅंचेस्टरमध्ये झालेला चौथा टेस्ट सामना अनिर्णीत राहिला. सामन्यानंतर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्शदीप ड्रेसिंग रूमच्या पायर्यांवर भांगड्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आणि सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. सामना संपल्यानंतर अर्शदीप ड्रेसिंग रूमकडे परतत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पायऱ्यांवर त्याने भांगडा करत आपल्या टीममधील विजयाचा जल्लोष साजरा केला.
पंजाब किंग्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून अर्शदीपचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं “मॅंचेस्टरमध्ये मूड.” या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
हे ही वाचा: 'फक्त माझ्या मुलालाच संधी नाही असं का?' 'मॅनचेस्टर'मध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूचे वडील भडकले
Mood in Manchester! #ENGvIND pic.twitter.com/lpShpFjkgN
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) July 28, 2025
हे ही वाचा: Team India: भारताचा 'हा' वेगवान गोलंदाज अचानक इंग्लंडहून परतला, संघानेच दिली अपडेट
अर्शदीपला या टेस्ट मालिकेत अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पहिल्या तीन सामन्यांत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि चौथ्या टेस्टसाठी तो दुखापतीमुळे बाहेर राहिला. मॅंचेस्टरमध्ये अर्शदीपचं टेस्ट डेब्यू होईल अशी चर्चा होती, पण दुखापतीमुळे त्याला मैदानात उतरता आलं नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं आहे की सर्व जलदगती गोलंदाज आता फिट असून, पाचव्या टेस्टमध्ये त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. अर्शदीपला अजून थोडं वाट पाहावं लागेल, मात्र त्याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आधीच आपली क्षमता सिद्ध केली आहे.
हे ही वाचा: Jasprit Bumrah: शेवटच्या टेस्टमध्ये बुमराह खेळणार? कोच गौतम गंभीरने दिले संकेत, म्हणाला 'भारतीय संघातील...'
चौथ्या टेस्टमध्ये बुमराहने दोन विकेट घेतल्या, अंशुल कंबोज आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट मिळवली, तर शार्दुल ठाकुरला यश मिळालं नाही. पाचव्या टेस्टमध्ये अर्शदीपबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. पहिला सामना इंग्लंडने, दुसरा भारताने जिंकला. लॉर्ड्सचा तिसरा टेस्ट इंग्लंडच्या नावावर गेला, चौथा अनिर्णीत राहिला. भारत पाचवा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवण्याच्या टार्गेटवर आहे, तर इंग्लंडला 3-1 ने बाजी मारायची आहे.