Arshdeep Singh Injured: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मैनचेस्टरमध्ये सराव सत्रादरम्यान भारतीय पेसर अर्शदीप सिंहच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे ही दुखापत त्यांच्या बॉलिंग आर्मवर झाली आहे, ज्यामुळे संघाच्या तयारीत थोडं टेन्शन निर्माण झालं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टेस्ट सामना 23 जुलैपासून मैनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्समध्ये झालेला पराभव विसरून पुन्हा सरावाला परतली आहे. पण पहिल्याच प्रॅक्टिस सत्रात अर्शदीपच्या दुखापतीची बातमी समोर आली आहे.
सरावादरम्यान साई सुदर्शनच्या फॉलो-थ्रूवर मारलेल्या बॉलला अर्शदीपने अडवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला कट लागला. त्यानंतर लगेचच त्यांच्या हाताला पट्टी बांधण्यात आली. अर्शदीपच्या हाताला टाका घालावे लागतील की नाही, हे डॉक्टरांच्या तपासणीनंतर स्पष्ट होईल. सध्या संघातील मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
#WATCH | Indian pacer Arshdeep Singh has sustained an injury ahead of the fourth Test match of the Anderson-Tendulkar Trophy 2025. Visuals from Team India's practice session in Beckenham, United Kingdom. pic.twitter.com/8aDucLFEPS
— ANI (@ANI) July 17, 2025
सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट म्हणाले, "अर्शदीपने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हाताला कट लागला. हा कट किती खोल आहे हे पाहावे लागेल. पुढील काही दिवसांत त्यांच्या फिटनेसवर निर्णय घेतला जाईल."
आतापर्यंत अर्शदीप सिंहने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे मैनचेस्टर टेस्टमध्ये डाव्या हाताच्या पेसरला खेळवण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करत होतं. त्यामुळे अर्शदीपच्या हाताला पट्टी पाहून त्यांचा चौथ्या टेस्टसाठी खेळणे सध्या तरी संदिग्ध आहे.
सध्या भारत 2-1 ने मालिकेत मागे आहे. इंग्लंडने लॉर्ड्स टेस्टमध्ये विजय मिळवत आघाडी घेतली आहे. याआधी भारताने एजबेस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर लीड्स टेस्ट इंग्लंडने जिंकली होती. भारताला मालिकेत कमबॅक करण्यासाठी मैनचेस्टरचा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. ओवलमधील निर्णायक टेस्टपर्यंत पोहोचण्यासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे.