Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ASHES 2019: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी

 प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेज सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

ASHES 2019: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी

बर्मिंघम : प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेज सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. विश्वविजेत्या इंग्लंड आणि ऑस्ट्रलिया या दोन्ही टीमसाठी ही सीरिज प्रतिष्ठेची समजली जाते. अॅशेजला अवघा एक दिवसआधीच ऑस्ट्रेलियाला आनंदाची बातमी आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजा फिट झाला आहे. तसेच ख्वाजा आणि जेम्स पॅटिन्सन हे अॅशेज मधील पहिली टेस्ट खेळतील, अशी माहिती प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली.

ख्वाजाचे पुनरागमन झाल्याने टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. ख्वाजाने त्याची फिटनेस टेस्ट पास केली आहे. ख्वाजाला वर्ल्ड कप दरम्यान हॅमस्ट्रिंगमुळे वर्ल्ड कपच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते.

'ख्वाजा एशेजमध्ये वनडाऊन म्हणजेच (तिसऱ्या) क्रमांकावर खेळेल. तसेच या सीरिजमध्ये जेम्स पॅटिंसन आपल्या बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावेल.' अशी आशा प्रशिक्षक लँगर यांनी व्यक्त केली. जेम्स पॅटिंसन ऑस्ट्रेलिया टीममध्ये जवळपास ४० महिन्यांनी पुनरागमन करत आहे.  

ख्वाजाबद्दल काय म्हणाले लँगर ?

'ख्वाजा खेळणार आहे, हे निश्चित आहे. ख्वाजा पूर्णपणे फीट आहे. तो चांगल्या प्रकारे खेळत आहे. ख्वाजा आमच्यासाठी खास आहे. त्याची टेस्ट सरासरी ही ४० पेक्षा जास्त आहे. त्याचा हॅमस्ट्रिंगचा त्रास बरा झाला आहे. तो आता व्यवस्थित धावू शकतो. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे.' अशी माहिती लँगर यांनी दिली.  

'पॅटिंसन हा चांगला बॉलर आहे. मला आशा आहे प्लेइंग-११ मध्ये त्याला टीम पेन खेळण्याची संधी देईल.' अशी आशा लँगर यांनी व्यक्त केली. पहिल्या टेस्टसाठी जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क आणि पीटर सिडल यांच्यात तिसऱ्या बॉलरच्या जागेसाठी शर्यतीत आहेत. या तिघांपैकी कोणाला संधी मिळेल हे मॅच आधीच स्पष्ट होईल. निवडकर्त्यांसाठी हा पेच असेल. तर दुसऱ्या ठिकाणी मात्र पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क मुख्य बॉलर म्हणून खेळतील.

'आम्ही केवळ ३ बॉलर खेळवणार आहोत. प्रत्येत मॅचमध्ये निदान आणि किमान ३ बॉलर खेळवणार. अॅशेजमध्ये प्रतिस्पर्धी संघ तोच असतो.  पण परिस्थिती वेगळी आहे.' असे लँगर म्हणाले. अॅशेज सीरिज १ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत खेळण्यात येणार आहे. 

Read More