IPL 2025 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians VS Gujrat Titans) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईचा 36 धावांनी पराभव करून सामना जिंकला. मुंबईचा नव्या सीजनमधील हा दुसरा पराभव होता. तर गुजरात टायटन्सने मुंबईला पराभूत करून विजयाचं खातं उघडलं. मात्र या सामन्यादरम्यान एका कृतीवरून गुजरात टायटन्स हेड कोच आशिष नेहरा (Ashish Nehra) त्याच्या खेळाडूंवर प्रचंड चिडला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 63, शुभमन गिलने 38, जोश बटलरने 39, तर शेरफेन रदरफोर्डने 18 धावा केल्या. गुजरात टायटन्सने 8 विकेट्स गमावून 196 धावा केल्या आणि मुंबईला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले. गुजरातचा हेड कोच आशिष नेहरा हा नेहमी बाउंड्री लाईनवर किंवा डग आउटमध्ये सक्रिय असलेला दिसतो. तेथून तो खेळाडूंना सामन्यादरम्यान संदेश देताना दिसतो. मुंबई विरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात सुद्धा असेच झाले.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने 63, शुभमन गिलने 38, जोश बटलरने 39 धावा करून चांगली सुरुवात करून दिली. मात्र गुजरातच्या फलंदाजीची मधली फळी गडबडली. शाहरुख खान, साई सुदर्शन, राहुल तेवटीया, शेरफेन रदरफोर्ड, राशिद खान आणि साई किशोर यांनी मोठी खेळी न करता स्वस्तात विकेट गमावल्या. विशेष म्हणजे 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर साई सुदर्शनची विकेट गमावली. तर 19 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर राहुल तेवटीयाने एकही धाव न घेता विकेट गमावली. हार्दिकने त्याला रनआउट केले. तर पुढच्याच बॉलवर शेरफेन रदरफोर्डला झेल बाद करण्यात चहरला यश आले. त्यामुळे गुजरातने सलग तीन बॉलवर तीन विकेट गमावल्यामुळे हेड कोच आशिष नेहरा संतापला आणि डगआउटमधून रागाने खेळाडूंवर ओरडताना दिसला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सचा लागोपाठ दुसरा पराभव, कॅप्टन हार्दिक पंड्याने 'या' खेळाडूवर फोडलं खापर
How I cry when things don't go according to me in my life:
Prachi Khandelwal (PrachiK2107) March 29, 2025
Unreal reaction Ashish Nehra ji GTvsMI GTvMI MIvsGT IPL2025 AshishNehra pic.twitter.com/Bxig8utYut
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू
शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा