Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?

Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. 

Asia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?

PCB Wants Asia Cup 2023 Shift To Pakistan: एशिया कप स्पर्धेतला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. एशियन कप स्पर्धेचा (Asia Cup 2023) पाकिस्तान हा आयोजक देश आहे. पण बीसीसीआयने (BCCI) पाकिस्तानात न खेळण्याची ठोस भूमिका घेतल्यामुळे हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव देण्यात आला. यानुसार एशिया कप स्पर्धेतले चार सामने पाकिस्तानात  (Pakistan) तर अंतिम फेरीसह नऊ सामने श्रीलंकेत (Sri Lanka) खेळवले जाणार आहेत. यात भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. 

लंकेत पावसाचा खेळ
श्रीलंकेत सध्या पावसाचा खेळ सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार एशिया कप स्पर्धेतील कोलंबोत खेळवले जाणारे सामने दुसरीकडे हलवले जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतल्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात कोलंबोत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एशियन क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष जय शाह यांना एक पर्याय दिला आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वळलं आहे. पाकिस्तान एशिया कप स्पर्धेचा आयोजक देश आहे. 

पाकिस्तानात होणार सर्व सामने?
बीसीसीआयने एशिया कप स्पर्धेचे सामने पाकिस्तान खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानबरोबर श्रीलंकेला या स्पर्धेचं यजमापद देण्यात आलं. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. पण कोलंबोत पावसाचं सावट आहे. त्यामुळे कोलंबोत खेळवले जाणारे चार सामने रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीसीबीचे अध्यक्ष जका अशरफ यांनी बीसीसीआयचे सचिव आणि एशिय क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष जय शाह यांना एशिया कप स्पर्धेतली उर्वरीत सर्व सामना पाकिस्तानात खेळवण्याचा पर्याय दिला आहे. एशिया कप स्पर्धेत सहा संघांमध्ये एकून 13 सामने आहेत. यातले नऊ सामने लंकेत रंगणार आहे. अंतिम सामनाही श्रीलंकेतच होणार आहे. 

कोलंबोत महत्त्वाचे सामने
सुपर-4 आणि अंतिम सामन्याचा मान श्रीलंकेला देण्यात आला आहे. कोलंबात 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये सामने खेवले जाणार आहेत. पण कोलंबोत सध्या मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे कोलंबोत वाताहात झाली आहे. दुसरीकडे कँडीतही पावसाने हजेरी लावली आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान कँडीतल्या पल्लेकल स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. 

या स्टेडिअममध्ये होणार सामने?
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबोत खेळवले जाणारे सर्व सामने कँडीत पल्लेकल स्टेडिअमध्ये हलवण्याचा विचार सुरु आहे. दांबुला स्टेडिअमचाही पर्याय आहे. पण दांबुला स्टेडिअमवर प्लड लाईट्सचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान श्रीलंकेतल्या हॉटेलमधल्या सुविधेवर टीम इंडियाचे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. सुपर फोरचे सामने 6 सप्टेंबर पासून खेळवले जाणार आहे. सुपर-4मध्ये पहिल्या सामन्यात म्हणजे सहा सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. पण हा सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे. पुढचा संपूर्ण आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Read More