Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asia Cup 2025 मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द होणार? अधिकाऱ्याने केलं मोठं वक्तव्य

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 या स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा या सामन्याबाबत UAE च्या एका अधिकाऱ्याने महत्वाचं वक्तव्य केलंय.   

Asia Cup 2025 मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द होणार? अधिकाऱ्याने केलं मोठं वक्तव्य

Asia Cup 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान (India VS Pakistan) या दोन देशांमधील संबंध आणखीन ताणले गेले आहेत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 ची (Asia Cup 2025) घोषणा झाली असून यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय. एवढंच नाही तर दोघांमध्ये 14 सप्टेंबर रोजी ग्रुप स्टेज सामना होणार आहे. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कोणताही सामना खेळू नये अशी मागणी अनेकांनी केलीये. तेव्हा या सामन्याबाबत UAE च्या एका अधिकाऱ्याने महत्वाचं वक्तव्य केलंय. 

WCL मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिला नकार : 

काही दिवसांपूर्वी वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्समध्ये युवराज सिंहच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध ग्रुप स्टेज सामना खेळण्यास नकार दिला होता. एवढंच नाही तर भारत - पाक यांच्यात सेमी फायनल खेळवण्याची वेळ आली तेव्हा टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार देऊन स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे आशिया कपमध्ये सुद्धा भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारत - पाकिस्तान सामन्याबाबत फॅन्सच काय मत?

भारत पाकिस्तान हे संघ आशिया कप 2025 मध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. रिपोर्ट्सनुसार 14 सप्टेंबर 2025 रोजी भारत पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना पार पडेल. जर दोन्ही संघ सुपर फोरमध्ये पोहोचले तर एकाच स्पर्धेत दोनदा संघ आमने सामने येऊ शकतात. काही फॅन्स हे खेळाच्या मैदानात राजकारण आणू नये आणि दोन्ही देशांमध्ये सामना व्हावा या भूमिकेवर आहेत. तर काही फॅन्स दहशतवादी पाकिस्तान  सामना खेळू नये अशी भूमिका घेत आहेत. 

हेही वाचा : Shubman Gill ला मिळाली मोठी जबाबदारी, इंग्लंड दौऱ्यानंतर मोठी घोषणा; मिस करू शकतो Asia Cup 2025

 

UAE बोर्डच्या अधिकाऱ्याने काय सांगितलं?

आशिया कप 2025 ही स्पर्धा यंदा यूएईमधील दुबई आणि अबुदाबी येथे खेळवली जाणार आहे. UAE बोर्डच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुभान अहमदने 'द नॅशनल' शी बोलताना सांगितलं, 'आम्ही याची कोणतीही गॅरंटी देऊ शकत नाही. पण आशिया कपची तुलना वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स सारख्या खाजगी स्पर्धेच्या आयोजनाशी करणे योग्य नाही. आशिया कप खेळण्यापूर्वी प्रत्येक देशांच्या सरकारांकडून परवानगी घेतली जाते. देशांनी त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी हे निश्चितच केलेले आहे. म्हणून आशा आहे की आशिया कप स्पर्धेत WCL सारखी परिस्थितीत राहणार नसेल.

FAQ : 

1. आशिया कप 2025 एकूण किती संघ घेणार सहभाग? 

आशिया कप 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून यात भारत, अफगानिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, हॉन्ग-कॉन्ग, ओमान आणि यूएई इत्यादींचा सहभाग आहे. या संघांना दोन ग्रुपमध्ये विभागलं जाईल. 

2. भारताने किती आशिया कप जिंकले आहेत?

भारतीय क्रिकेट संघ हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 16 स्पर्धांपैकी आठ वेळा विजेतेपद जिंकले आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्या पाच सिजनपैकी चार जिंकले आहेत. तर 1988 ते 1995 दरम्यान सलग तीन वेळा आशिया कप विजेतेपद जिंकणारा भारत एकमेव संघ आहे.
 
3. विराट कोहली आशिया कप 2025 खेळणार?

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे यंदा आशिया कप 2025 च्या स्पर्धेत खेळणार नाही. याचं कारण म्हणजे त्यांनी 2024 मध्ये टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीये आणि यंदा आशिया कप हा टी 20 फॉरमॅटमध्येच खेळवला जाईल. 

Read More