Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'एशियन गेम्स'मध्ये रोअर दुष्यंत चौहाननं पटकावलं कान्स्य

आता भारताच्या खात्यात तब्बल १९ मेडल्सची भर पडलीय 

'एशियन गेम्स'मध्ये रोअर दुष्यंत चौहाननं पटकावलं कान्स्य

मुंबई : भारतीय रोअर दुष्यंत चौहाननं पुरुष लाईटवेल सिंगल स्कल्समध्ये कान्स्य पदकासोबत एशियन गेम्सच्या सहाव्या दिवसाची सुरुवात केलीय. आता भारताच्या खात्यात तब्बल १९ मेडल्सची भर पडलीय. यामध्ये ४ सुवर्ण पदक, ४ रौप्य पदक आणि ११ कान्स्य पदकांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, रोईंगमध्ये भारताचं हे पहिलंच मेडल आहे. 

यंदा एशियन गेम्समध्ये सहभाग घेतलेल्या ३४ भारतीय रोअर्सपैंकी ३३ जण सेनेतून आहेत. 

रोईंगच्या डबल्स स्कल्स इव्हेंटमध्ये भारताच्या रोहित कुमार आणि भगवान सिंह यांनी देशाला कान्स्य पदक मिळवून दिलंय.  

Read More