Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिकेटमध्ये अचूक भविष्य वर्तवणाऱ्याची विराटबद्दल मोठी घोषणा

दिग्गज ज्योतिषी नरेंद्र बुंदे हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या अचूक भविष्याबाबत प्रसिद्ध आहेत.

क्रिकेटमध्ये अचूक भविष्य वर्तवणाऱ्याची विराटबद्दल मोठी घोषणा

मुंबई : दिग्गज ज्योतिषी नरेंद्र बुंदे हे त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या अचूक भविष्याबाबत प्रसिद्ध आहेत. नरेंद्र बुंदेंनी आता विराट कोहलीबाबतही भविष्य वर्तवलं आहे. विराट कोहली यावर्षीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी उंची गाठेल. तसंच कोणीही विचार केला नसेल असा जाहिरातीचा करार विराट यावर्षी करेल, असं भविष्य बुंदेंनी व्यक्त केलं आहे.

मागच्या वर्षी धोनीच्या वनडे टीममधल्या स्थानावर प्रश्न उपस्थित करण्या येत होते, तेव्हा धोनी इंग्लंडमध्ये होणारा २०१९ चा वर्ल्ड कप खेळेल, असं भविष्य बुंदेंनी केलं होतं.

'सचिनचं रेकॉर्ड मोडणार विराट'

विराट कोहली २०२५ पर्यंत टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप खेळेल. वर्ल्ड कप विजेता बनण्याबरोबरच कोहली सचिन तेंडुलकरचं शंभर शतकांचं रेकॉर्डही मोडेल, असं बुंदे म्हणाले आहेत.

बुंदेंच्या याआधीची भविष्य

याआधी नरेंद्र बुंदेंनी सचिनचं दुखापतीनंतरच पुनरागमन, भारत रत्न पुरस्कार, माजी कॅप्टन सौरव गांगुलीचं कमबॅक आणि २०११ वर्ल्ड कप विजय याबाबत अचूक भविष्यवाणी केली होती. परदेशामध्ये विराटच्या नेतृत्त्वात विजय मिळवण्याची वेळ आता आली आहे, असं बुंदेंना वाटतंय. गांगुली, मुरली कार्तिक, श्रीसंत, जहीर खान, गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांनी नरेंद्र बुंदेंकडून सल्ला घेतला आहे. 

Read More