Shikhar Dhawan Gave A Reply to Shahid Afridi: पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत जबरदस्त बदला घेतला आहे. भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. या हल्ल्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने एक प्रतिक्रिया दिली आहे. धवनने बुधवारी पहाटे त्याच्या सोशल मीडियावर भारतीय सशस्त्र दलाच्या पाकिस्तानमधील यशस्वी 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक केले आहे. पाकिस्तानविरुद्ध आपले विचार मांडणाऱ्या धवनने लिहिले: "भारत दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतो". हिंदीमध्ये त्याने "भारत माता की जय" असेही लिहिले.
शिखर धवनने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ऑपरेशनच्या यशाचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी लिहिले की, 'जे सांगितले ते केले. न्याय मिळाला. भारत माता चिरंजीव होवो! ' शिखर धवन अलिकडे खूप चर्चेत होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर धवन आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध झाले होते. आताही धवनने शाहिद आफ्रिदीला चोख उत्तर दिले आहे.
त्यानंतर आफ्रिदीने धवनला आराम करण्यास आणि चहा पिण्यास सांगितले. आता, 'ऑपरेशन सिंदूर' नंतर, धवन चहा पित असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की, "शेजाऱ्यांनो चहा कसा वाटला?...". परंतु हा फोटो शिखरने पोस्ट केला नसून त्याच्या एका फॅन पोस्टने केला आहे.
Aur kaisi lagi chai padosiyon pic.twitter.com/bCZdpVUEd6
— Shikkar Dhawen (@76off43) May 7, 2025
हा व्हायरल झालेला फोटो भारताच्या माजी क्रिकेटपटू शिखर धवनने 7 फेब्रुवारी 2024 रोजी पोस्ट केला होता. हाच फोटो आता नेटिझन्स आफ्रिदीची खिल्ली उडवण्यासाठी वापरत आहेत.
Bhai Shahid Afridi ko tag karke phir se ek bar or pel so
— Professor Sahab (@ProfesorSahab) May 7, 2025
@SAfridiOfficial how’s the josh baby hope you like the morning tea pic.twitter.com/fqxAZOvfri
— Gurpreet singh gill (@IGsgill) May 7, 2025
हे ही वाचा: 'जय हिंद की सेना...' वीरेंद्र सेहवाग ते वरुण चक्रवर्ती Operation Sindoor वर क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया
Afridi ko bhi tag kar dete paaji
— Pratham (@Pratham_Tweetz) May 7, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अत्यंत असंवेदनशील पद्धतीने आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली होती. यावरूनही आफ्रिदी आणि धवन यांच्यातील वादविवाद सुरू झाला होता.