India vs Australia, 2nd ODI :ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, पावसामुळे त्यांना 33 ओव्हरमध्ये फक्त 313 धावांचं टार्गेट मिळालं. त्याला पार करताना देखील कांगारूंची दैना उडाली. आश्विन आणि जड्डूच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलिया नांग्या टाकल्या आणि भारताला मोठा विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 2-0 ने मालिका देखील खिशात घातली आहे. (India beat australia by 99 runs in 2nd ODI)
पावसामुळे खेळ फिरणार की काय? अशी चिंता होती. ऑस्ट्रेलियाला 313 धावा करायच्या होत्या. पावसाआधी प्रसिद्ध कृष्णाने देखील सुरूवातीला दोन दणके देत कांगारूंना बॅकफूटवर आणलं.पावसानंतर वॉर्नर अँड कंपनी सामना अटीतटीला नेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, आश्विनने गेम फिरवला. फक्त 7 बॉलमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट घेत आश्विनने खऱ्या अर्थाने दम दाखवून दिला. त्यानंतर जड्डूने आपलं बोट वाकडं करत तीन फलंदाज गारद केले.
That's that from the 2nd ODI.
— BCCI (@BCCI) September 24, 2023
Jadeja cleans up Sean Abbott as Australia are all out for 217 runs in in 28.2 overs.#TeamIndia take an unassailable lead of 2-0.#INDvAUS pic.twitter.com/LawVWu2JI8
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर ऋतुराज लवकर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या 10 ओव्हरमध्ये 80 धावा उभ्या केल्या. त्यानंतर दोघांनी घेर बदलले अन् दोन्ही खेळाडूंनी वादळी शतक ठोकलं. त्यांच्या ऐतिहासिक भागेदारीनंतर कॅप्टन केएल राहुलने फिनिशिंग टच दिला अन् सूर्याने उर्वरित काम केलं. सूर्यकुमार यादवने मोबाईल गेमप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली अन् ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचं आव्हान उभं केलं होतं.
A thorough all-round performance
— ICC (@ICC) September 24, 2023
India take an unassailable 2-0 series lead against Australia with a big win in Indore
#INDvAUS: https://t.co/pO3kSaXW6C pic.twitter.com/MlSxsRVvxN
आणखी वाचा - आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (C), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (C), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.