Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

त्यांनी पहिले माझे कपडे उतरवले आणि...; क्रिकेटरची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

तब्बल 15 महिन्यांनंतर त्याने आपल्या अपहरणाच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत.

त्यांनी पहिले माझे कपडे उतरवले आणि...; क्रिकेटरची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या अपहरणाबद्दल असे खुलासे केलेत, जे जाणून घेतल्यावर तुम्हीही हळहळाल. तब्बल 15 महिन्यांनंतर त्याने आपल्या अपहरणाच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत. मॅकगिलच्या या वेदनादायक घटनांबद्दल जाणून घेतल्यानंतर चाहतेही हैराण झालेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिलला गेल्या वर्षी त्याच्या सिडनीच्या घरातून किडनॅपर्सच्या एका गटाने उचललं होते. त्यानंतर किडनॅपर्सने त्याला शहराच्या एका भागात नेलं आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं. 

सेन डब्ल्यूए ब्रेकफास्टला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा करताना मॅकगिल म्हणाला, “वाईट शत्रूसोबतही कधी घडू नये अशी ही घटना होती. मला गाडीमध्ये बांधलं होतं. मला गाडीत बसायचे नव्हतं आणि मी त्याला दोनदा सांगितले, मी गाडीत बसणार नाही. पण शस्त्राच्या बळावर त्यांनी मला घाबरून उचलले. जवळपास दीड तास गाडीत होतो.

तो पुढे म्हणाला, "आम्ही कुठे आहोत हे मला माहीत नव्हतं. आम्ही कुठे जात होतो हे मला कळत नव्हतं आणि मी खूप घाबरलो होतो. त्यावेळी त्यांनी मला नग्न केलं आणि मला मारहाण केली. शिवाय त्यांनी मला धमकीही दिली. त्यानंतर मला फेकून दिलं. संपूर्ण घटना तीन तासांत संपली असावी."

Read More