क्रिकेट जगतात कधी काय होईल याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. अलीकडेच एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी, एका तरुण क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा क्रिकेटर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान सलामीवीर विल पुकोव्स्की (Will Pucovski) हा आहे. याने वयाच्या 27 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर (Will Pucovski announces retirement) केली आहे. एकढ्या कमी वयात निवृत्ती जाहीर करण्यामागचे कारणही धक्कादायक आहे. चला जाणून घेऊयात काय आहे कारण...
विल पुकोव्स्कीने जानेवारी 2021 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी त्याचा एकमेव कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात 62 धावा केल्या. विल पुकोव्स्कीने सेन क्रिकेटला सांगितले की, "मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे वर्ष खरोखरच कठीण होते. याचा सरळ अर्थ असा आहे की मी पुन्हा कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळणार नाही. त्या शेवटच्या दुखापतीमुळे मला काहीही करायला त्रास झाला, अगदी घरात फिरणे हा देखील एक संघर्ष ठरला."
हे ही वाचा: विवाहबाह्य संबंधांमुळे ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचा घटस्फोट? फुटबॉलपटू पती 2022 पासून...
27 वर्षीय विल पुकोव्स्की शेवटचा मार्च 2024 मध्ये शेफील्ड शिल्ड खेळला होता, तेव्हा वेगवान गोलंदाजाचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला.ज्यामुळे त्याला दुखापत झाली होती.
Luckless Victorian Will Pucovski, again hit by a short ball. He's gone off, retired hurt. Awful to see. @9NewsMelb pic.twitter.com/sp1YtP5Owd
— Trent Kniese (@trent_kniese) March 3, 2024
विल पुकोव्स्की म्हणाला, "माझी मंगेतर नाराज होण्याची कारण, मी घरकामात मदत करत नव्हतो. मी खूप झोपायचो. तेव्हापासून हे एक कठीण वर्ष झाले. बरीच लक्षणे अजूनही गेली नाहीत, ज्यामुळे मी हा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही महिने भयानक होते." विल पुढे म्हणाला, "मानसिक आरोग्यासंबंधितही समस्या जाणवल्या. थकवा येतो, जो खूप वाईट आहे, मला नियमितपणे डोकेदुखी होते. माझ्या डाव्या बाजूला असलेल्या अवयवांशी मला खूप झगडावे लागते. जर माझ्या डाव्या बाजूला काही झाले तर मला चक्कर येऊ लागते. मला हालचाल करताना त्रास होतो. हे भितीदायक आहे. 27 व्या वर्षी, माझ्यासमोर खूप काही आहे आणि माझ्या आयुष्यात मला खूप काही साध्य करायचे आहे."
हे ही वाचा: वडील टेलर, मुलगा सुपरस्टार! IPL 2025 मध्ये मोठ्या फलंदाजांना आउट करणारा झीशान अन्सारी आहे तरी कोण?
विल पुकोव्स्की पुढे म्हणाला, "मला पुढील 15 वर्षे खेळायचे होते पण आता ते माझ्यापासून हिरावून घेण्यात आले, जे खूप वाईट आहे. निदान मला माहित आहे की माझे डोके पुन्हा दुखणार नाही, पण जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा ते भयानक असते. मला माहित आहे की या दुखापतींपूर्वी मी कसा होतो आणि आता मी कसा आहे. माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना माझ्यात फरक जाणवला आहे आणि तो माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी भीतीदायक आहे."