Cricket News : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेन ने त्याच्या कोचिंग करिअरची पुन्हा सुरुवात केली आहे. टिम पेनचं करिअर अनेक वादांनी वेढलेलं असूनही या माजी विकेटकिपर आणि फलंदाजावर ऑस्ट्रेलिया क्रिकेटने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याला ऑस्ट्रेलिया 'ए' संघाचं कोच बनवण्यात आलं असून याशिवाय तो बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्राइकर्सचा कोचही असणार आहे. टिम पेन (Tim Paine) हा 2018 ते 2021 पर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 23 सामने खेळले असून यातील 11 सामन्यात संघाचा विजय झाला तर 8 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर 4 सामने ड्रॉ झाले.
ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार टिम पेनचा नवा कार्यकाळ ऑस्ट्रेलिया 'ए' सोबत जुलै महिन्यापासून सुरू होईल. ऑस्ट्रेलिया ए जुलै महिन्यात श्रीलंके विरुद्ध श्रीलंका 'ए' विरुद्ध तीन वनडे आणि चार टेस्ट सामन्यांची सीरिज खेळवली जाईल. त्यानंतर सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया 'ए' भारत दौऱ्यावर येणार आहे. टिम पेन हेड कोच म्हणून ऑस्ट्रेलियाच्या ए संघाला इंग्लंड लायन्स विरुद्ध एक टेस्ट सामना खेळण्यासाठी सुद्धा कोचिंग देतील.
माजी क्रिकेटर टिम पेनने यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये अनेक संघासोबत काम केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल डेवलपमेंट कोच लॅचलन स्टीवंस यांच्या अंतर्गत सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. राष्ट्रीय गोलंदाजीचे प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ, राष्ट्रीय महिला संघ स्कॉट प्रेस्टॅव्हिज आणि नॉर्दर्न टेरिटरी क्रिकेट आणि डेवलपमेंट कोच ट्रेंट कीप इत्यादी श्रीलंका दौऱ्यावर टीम पेनला सहाय्य करतील.
टिम पेन हा हेड कोच म्हणून ऑस्ट्रेलिया 'ए' शिवाय एडिलेड स्ट्राइकर्स आणि काही सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला सुद्धा कोचिंग देईल. त्याने मागील दोन वर्षात ऑस्ट्रेलियाच्या महिला आणि पुरुष संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.
हेही वाचा : IND VS ENG : पहिल्या मॅचचा टॉस इंग्लंडने जिंकला, कॅप्टन शुभमनने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
टिम पेन हा सॅण्डपेपर वादानंतर ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघाचा कर्णधार बनला होता. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या बॉल टॅम्परिंगनंतर त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. यानंतर, 2021 मध्ये त्याला त्याच्या माजी सहकाऱ्याला आक्षेपार्ह संदेश आणि फोटो पाठवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर टीम पेनला राजीनामा द्यावा लागला होता. मात्र यानंतर सुद्धा ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्याच्यावर हेड कोचची जबाबदारी झोपवल्याने त्यांच्यावर टिका केली जातं आहे.