Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy: 'भारताला खरं तर दुबईत...', ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मैकग्राने स्पष्ट सांगून टाकलं, 'जर पाकिस्तान...'

चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) खेळताना भारतीय संघाला इतर संघांप्रमाणे दोन देशांमध्ये प्रवास करावा लागला नसला तरी त्यांनी सर्व स्थितींशी जुळवून घेतल्याचं श्रेय द्यायला हवं असं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर ग्लेन मैकग्राने (Glenn McGrath) म्हटलं आहे.   

Champions Trophy: 'भारताला खरं तर दुबईत...', ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मैकग्राने स्पष्ट सांगून टाकलं, 'जर पाकिस्तान...'

चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) मध्यात भारतीय संघाला फक्त दुबईत खेळल्याचा फायदा होत असल्याचा दावा अनेक माजी खेळाडूंनी करण्यास सुरुवात केली. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर चॅम्पिअन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात आली. भारतीय संघ वगळता सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले. तर भारताचे सामने दुबईत खेळले गेले. यामुळे जर भारताविरोधात सामना असेल तर त्या संघांना दुबईचा प्रवास करावा लागत होता. इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाला प्रवास करावा लागत नसल्याने त्यांना अतिरिक्त फायदा मिळत असल्याचा दावा करण्यात आला. पण ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर ग्लेन मैकग्राने (Glenn McGrath) हा दावा फेटाळून लावला आहे. 

हायब्रिड मॉडेल तयार होण्यापूर्वीच, भारतीय संघाचा प्रवास मर्यादित करण्यासाठी लाहोरची निवड करण्यात आली होती. परंतु, बीसीसीआयने खेळाडूंना सीमेपलीकडे पाठवण्यास नकार दिल्यानंतर, लाहोरची जागा दुबईने घेऊन असेच मॉडेल तयार करण्यात आले. भारतीय संघाला इतर संघांप्रमाणे पाकिस्तान-दुबई प्रवास करावा लागला नाही हे सत्य असलं तरी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतल्याचं श्रेय द्यायला हवं असं ग्लेन मैकग्राचं म्हणणं आहे. 

"जर ते तसं आहे तर आहे. भारत आता पाकिस्तानचा प्रवास करत नाही. यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सामने दुबईत खेळवण्यात आले. पण भारताला याचं क्रेडिट दिलं पाहिजे. ते वेगळ्या परिस्थितींमध्ये खेळले. त्यांनी फिरकी खेळपट्टीवर कसं खेळायचं हे माहिती आहे. मला वाटत नाही त्यांना फायदा झाला. जर भारताने सगळे सामने भारतात किंवा ऑस्ट्रेलियाने आपले सगळे सामने ऑस्ट्रेलियात खेळले असते तर त्यांना फायदा झाला असं म्हणता आलं असतं," असं ग्लेन मैकग्राने सांगितलं आहे. 

मॅकग्राच्या मते आयपीएलने भारतीय क्रिकेटला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. आयपीएलमुळे नवीन स्टार खेळाडू उदयास येत आहेत. "त्यांच्या आयपीएल आणि टी-20 क्रिकेटचा एकदिवसीय क्रिकेटवर सकारात्मक परिणाम झाला आहे. भारत आत्मविश्वासू आहे आणि त्यांना त्यांचा खेळ चांगला माहित आहे. कसोटी क्रिकेटचं संरक्षण करणे महत्वाचे आहे, परंतु एकदिवसीय आणि विश्वचषक देखील खूप महत्वाचे आहेत. भारताला एकदिवसीय खेळ खूप चांगला माहित आहे. इतर संघांसाठी भारतात येऊन चांगले खेळणे हे एक आव्हान आहे. मला त्यांना आव्हान दिले जाणे आवडते, परंतु भारत एक दर्जेदार संघ आहे," असं मॅकग्रा म्हणाला.

Read More