ICC Test Ranking : शनिवार 14 जून रोजी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटने पराभव करून सामना जिंकला. तब्बल 27 वर्षांनी त्यांनी आयसीसी ट्रॉफी जिंकली मात्र टेस्ट चॅम्पियनशिप जिंकून सुद्धा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये त्यांना नंबर 1 चं स्थान मिळवता आलं नाही. 2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपने त्यांनी विजय मिळवला पण टेस्ट रँकिंगमध्ये ते सर्वोच्च स्थान मिळवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने नंबर 1 वर आपलं वर्चस्व कायम ठेवलं तर दक्षिण आफ्रिका नंबर 2 वर राहिली.
आयसीसीकडून नवीन टेस्ट रँकिंग जाहीर करण्यात आली. ज्यात पुरुषांच्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया 123 रेटिंग सह नंबर एकवर असून दक्षिण आफ्रिका 114 रेटिंग सह नंबर 2 वर आहे. त्या खालोखाल इंग्लंडचा संघ 113 रेटिंग सह नंबर 3 वर असून नंबर 4 वर 105 रेटिंग सह भारत आहे.
टेस्ट टीम रँकिंगमध्ये भारतीय संघाबाबत बोलायचं झालं तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सीरिजमध्ये पराभूत झाल्यावर चौथ्या स्थानावर घसरली. आता शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहेत. तेव्हा यात टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करून टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या तीनमध्ये स्थान मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला सरळ जिंकता येईना म्हणून टेम्बा बावुमासोबत काय केलं पाहिलं का? टेम्बा स्वत: केला खुलासा
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना - 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना - 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना - 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना - 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना - 31 जुलै ते 4 ऑगस्ट
ऑस्ट्रेलियाला विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हटले जात होते, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला गुडघ्यावर आणलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार बवूमा याने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. पहिल्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 138 धावांवर ऑल आउट केले. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाला 207 धावांवर रोखलं ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावांचं आव्हान मिळालं.
विजयासाठी मिळालेलं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या एडन मारक्रमने शतक ठोकलं. तर कर्णधार बवूमाने देखी नाबाद अर्धशतकीय कामगिरी केली. दोघांनी नाबाद राहून तिसऱ्या दिवशीचा खेळ 213 धावांवर संपवला, आता चौथ्या दिवशी विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला केवळ 69 धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी संयमी फलंदाजी करून ५ विकेटने विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.