David Warner in Film Robinhood: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये खेळलेला डेव्हिड वॉर्नर आता क्रिकेटनंतर अभिनयाच्या जगातही उतरला आहे. डेव्हिड वॉर्नर हा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो. आता त्याने साऊथ अभिनेता नितीन आणि श्रीलीला यांच्या 'रॉबिनहूड' या तेलगू चित्रपटातून भिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात डेव्हिड वॉर्नरने कॅमिओ केला आहे. त्याचा सीन केवळ 3 मिनिटांचा यासला तरी अल्पावधीतच त्याने त्याच्या अभिनयाच्या स्किलने चाहत्यांची मने जिंकली आहे. त्याच्या अभिनयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चित्रपट 28 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे
डेव्हिड वॉर्नरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनयाच्या जगात प्रवेश केला असे बोलता येईल. यंदाच्या आयपीएलच्या सिजनमध्ये त्याला विकत घेतले नसले तरी त्याने वेगळ्या क्षेत्रातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमातून अभिनय कौश्यल दाखवून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
हे ही वाचा: शंका खरी ठरली! 'ही' सुंदरी चढली मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये, हार्दिकला नवीन प्रेम मिळलं?
'रॉबिन हूड' चित्रपटातील "डेव्हिड भाई" हे त्याचे पात्र आहे, ज्यामध्ये तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहते त्याचा स्वॅग आणि स्फोटक डायलॉगला पसंती देत आहेत.
हे ही वाचा: MI vs KKR: ज्या वानखेडेवर उडवण्यात आलेली हार्दिकची खिल्ली तिथेच काल काय घडलं पाहा
DAVID BHAI
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) March 31, 2025
Enjoy @davidwarner31's MASS & SWAG on the big screens
Book your tickets for #Robinhood now!
https://t.co/ogblfmwZTd@actor_nithiin @sreeleela14 @VenkyKudumula @davidwarner31 @gvprakash #RajendraPrasad @vennelakishore @DevdattaGNage #SaiSriram… pic.twitter.com/PsMo0emXl4
वॉर्नरच्या पत्राची खासियत म्हणजे त्याची स्टाईल. त्या भूमिकेत तो एका गुंडसारखा दिसत असून हातात बंदूक घेऊन स्फोटक संवाद बोलताना दिसत आहे. "लॉलीपॉप लाल आहेत, शत्रू मेले आहेत" हा डायलॉग आणि त्याच्या स्वॅगने त्याच्या चाहत्यांना पूर्णपणे वेड लावले आहे.
हे ही वाचा: अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला मिळाले नवे प्रेम? IPL मॅचमधला 'या' व्यक्तीसोबतच Video Viral
इतकंच नाही तर डेव्हिड वॉर्नरने रॉबिनहूड चित्रपटाच्या अवघ्या 3 मिनिटांच्या सीनसाठी भरमसाठ फीही वसूल केली आहे.रिपोर्ट्सनुसार, त्याने एका दिवसाच्या शूटिंगसाठी 1.25 कोटी रुपये फी मागितली होती. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नरने या छोट्या भूमिकेसाठी एकूण अडीच कोटी रुपये आकारले.