Astralian Open Rafeal Nadal Lossed His Racket: ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असून राफेल नादालला पहिल्याच सामन्यात धक्कादायक अनुभव आला. ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेत राफेलचा पहिला सामना जॅक ड्रॅपर विरुद्ध सुरु होता. पहिल्या सेटमध्ये 4-3 अशी स्थिती असताना राफेल नादालनं रॅकेट बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र बसण्याच्या ठिकाणी रॅकेट नसल्याचं पाहून धक्का बसला. त्यानंतर बॅगमध्येही रॅकेट नसल्याचं पाहून राफेल पुरता कावराबावरा झाला. मग कालांतराने त्याच्या लक्षात आलं की बॉलबॉय दुरुस्त करण्यासाठी चुकीचं रॅकेट घेऊन गेला. त्यानंतर पंचांकडे त्याने आपली व्यथा मांडली. राफेलने पंचांना सांगितलं की, "बॉलबॉय माझं रॅकेट घेऊन गेला आहे. ते रॅकेट मला हवं आहे."
ऐन सामन्यात असा प्रकार घडल्याने टेनिस कोर्टवर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राफेलने आपल्या बॅगेतून दुसरं रॅकेट काढून सामना खेळण्यास सुरुवात केली. या सामन्यात पहिला सेट राफेल नदालनं 7-5 नं जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ड्रॅपरने जोरदार कमबॅक केलं. ड्रॅपरने दुसरा सेट 6-2 ने जिंकला. त्यानंतर नदालने सामन्यात पुनरागमन करत सामना आपल्या नावे केला. नदाल टेनिस कोर्टवर आपल्या साहित्याबाबत कायमच सावधगिरी बाळगतो. प्रत्येक साहित्य व्यवस्थितरित्या ठेवतो. पण पहिल्यांदाच त्याला अशा अनुभवाला सामोरं जावं लागलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
"The ballboy took my racquet"
— #AusOpen (@AustralianOpen) January 16, 2023
A definite first for Rafa!#AusOpen • #AO2023 pic.twitter.com/T4xqN4ZLBd
V A M O S
— #AusOpen (@AustralianOpen) January 16, 2023
Make that career wins in Melbourne for Nadal!@RafaelNadal • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/HUTYoBilL5
बातमी वाचा- Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा
दुसरीकडे, राफेल नदालनं सामन्यानंतर निवृत्तीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. "खरं तर असं आहे की, मी आता टेनिस खेळत आहे. 2023 हे वर्ष माझ्यासाठी चांगलं असणार आहे. मी सामना जिंकण्यासाठी सर्वकाही करत आहे. सध्या तरी मी निवृत्तीचा कोणताही विचार केलेला नाही.", असं नदालनं सांगितलं.नदालने यापूर्वी 2022 मध्ये अंतिम फेरीत रशियाच्या मदेवेदेवचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचं दुसरं जेतेपद पटकावलं होतं. 21 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू ठरला होता.