Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Pak: 'मी तर गणित...,' कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना डोक्यात काय सुरु होतं? अक्षर पटेलने केला खुलासा

Axar Patel on Virat Kohli: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं. विराट कोहलीचं शतक हुकतं का काय? असं वाटत असतानाच त्याने आपल्या करिअरमधील 51 वं एकदिवसीय शतक ठोकलं.   

Ind vs Pak: 'मी तर गणित...,' कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना डोक्यात काय सुरु होतं? अक्षर पटेलने केला खुलासा

Axar Patel on Virat Kohli: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने 51 वं शतक ठोकलं. अखेरच्या क्षणी जिंकण्यासाठी काही धावा शिल्लक असताना विराट कोहलीने शतक ठोकलं आणि एकच जल्लोष झाला. विराट कोहलीने शतक ठोकलं तेव्हा त्याच्यासह मैदानात अक्षर पटेल होता. विराट कोहलीचं शतक व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत होतो आणि गणितंही आखत होतो असं अक्षर पटेलने सांगितलं आहे. 

40 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आऊट झाल्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्यावेळी भारताला विजयासाठी 19 धावांची गरज होती, तर विराट कोहली 86 धावांवर नाबाद खेळत होता. 

अक्षर पटेल फलंदाजी करताना शक्य होईल तेव्हा विराट कोहलीचं शतक व्हावं यासाठी त्याला स्ट्राईक देत होता. पण विराट कोहलीचं शतक पूर्ण होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी गरज असलेली धावसंख्या यातील अंतर कमी होत होतं. काही वाईड आणि बाईज नंतर अक्षर पटेलने विराट कोहलीला स्ट्राईकवर आणलं. 43 व्या ओव्हरला अक्षर पटेलने त्याला फलंदाजीची संधी दिली. 

विराट कोहलीने अखेरीस चौकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं आणि एकदिवसीय करिअरमधील 51 वं शतक लगावलं. अक्षर पटेलने सामन्यानंतर म्हटलं आहे की, "शेवटच्या वेळी मी त्याचं शतक पूर्ण व्हावं यासाठी गणित करत होतो. चेंडू बॅटच्या कडेला लागू नये याची मी काळजी घेत होतो. मला फार मजा आली," असं अक्षर पटेलने सांगितलं. तसंच विराट कोहलीने आपला फिटनेस अद्याप तसात ठेवल्याचं कौतुक वाटत असल्याचंही म्हटलं. 

2023 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरोधातील सामन्यातही विराट कोहली अशाच स्थितीत होती. त्यावेळी के एल राहुल त्याच्यासमोर खेळत होता. पुण्यात झालेल्या या सामन्यात के एल राहुलने त्याला शतक ठोकण्यासाठी मदत केली होती. 

Read More