IND VS ENG : भारत विरुद्ध इंग्लड (India VS England) यांच्यात अंडर-19 संघामध्ये पहिला युथ टेस्ट सामना हा बेकेनहॅमच्या काऊंटी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जातोय. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची कामगिरी खास ठरली नाही. वैभव फक्त 14 धावा करून बाद झाला. परंतु या सामन्यात अंडर 19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने कमाल केली. भारताची पहिली विकेट खूप लवकर गमावल्यानंतर आयुषने शतकीय खेळी केली. भारतीय संघाला खूप चांगल्या स्थितीत पोहोचवले.
भारतीय संघाने शनिवारी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आणि 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हे दोघे सलामी फलंदाजीसाठी मैदानात आले. वैभवने त्याच्या इनिंगची जबरदस्त सुरुवात केली. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये तीन चौकार ठोकले पण एक मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो आउट झाला. वैभवने 13 बॉलमध्ये आणि 14 धावा केल्या. वैभव बाद झाल्यानंतर संघ सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार आयुषवर आली.
आयुषने लिलया सांभाळली. आयुषने आपल्या इनिंगमध्ये जबरदस्त शॉट्स लगावले. आयुषने 89 च्या स्ट्राईक रेटने आयुषने फलंदाजी करून 115 बॉलमध्ये 102 धावा केल्या. दरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार ठोकले. आयुषचं हे यूथ टेस्ट करिअरमधील पहिलं शतक होतं. आतापर्यंत आयुषने एकूण 4 शतक ठोकली आहेत. वैभव बाद झाल्यानंतर, आयुषने विहान मल्होत्रासोबत भारतीय डावाची सूत्रे सांभाळली घेतली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. विहाननेही शानदार अर्धशतक झळकावले. विहानने 99 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या डावात विहानने 9 चौकार आणि 1 षटकार मारला.