Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!

T20 World Cup 2024: टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

India vs Canada: चाहत्यांसाठी वाईट बातमी; 'या' कारणाने रद्द होऊ शकतो भारत विरूद्ध कॅनडा सामना!

T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. यावेळी टीम इंडियाने आता पर्यंत लीग स्टेजमध्ये झालेले सर्व सामने जिंकले आहेत. तर आज चौथा आणि लीग स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरूद्ध रंगणार आहे. टीम इंडियाने यापूर्वीच सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध कॅनडा हा सामना फ्लोरिडामध्ये होणार असून तो रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये पाऊस आहे आणि यामुळे हा सामना रद्द होऊ शकतो अशी शक्यता आहे. 

रद्द होणार भारत विरूद्ध कॅनडा सामना?

न्यूयॉर्कहून 1850 किमीचा प्रवास करून टीम इंडिया फ्लोरिडाला पोहोचली आहे.  भारत विरुद्ध कॅनडा सामन्यापूर्वी फ्लोरिडा शहरात तीन दिवस मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा देण्यात आला आहे. ग्रुप ए मधील उर्वरित तीन सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत. 15 जून रोजी होणाऱ्या भारत-कॅनडा सामन्यात 86% पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आधीच सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाल्यास टीम इंडियाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही. 

काय आहे हवामानाचा अंदाज?

टीम इंडिया 14 जून रोजी लाँडरहिलमध्ये सराव करणार होती. यावेळी पावसामुळे हे प्रॅक्टिस सेशन रद्द करण्यात आलं आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यानंतर राज्यातील अनेक भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासोबतच पुराची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडू शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यानंतर शनिवार आणि रविवारीही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा नाही. त्यामुळे भारत-कॅनडा सामना रद्द होण्याची शक्यता अधिक आहे. 

कॅनडाविरूद्ध कशी आहे टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णदार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह

Read More