Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

या भारतीय क्रिकेटपटूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती

बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. 

या भारतीय क्रिकेटपटूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती

मुंबई : बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. वसीम जाफरची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मिरपूरमधल्या आपल्या अॅकेडमीमध्ये बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कैसर अहमद म्हणाले, 'जाफरशी मिरपूरमध्ये बीसीबी अॅकेडमीचा बॅटिंग सल्लागार म्हणून मेपासून एप्रिल २०२० पर्यंतचा करार करण्यात आला आहे. आधी वसीम जाफर अंडर-१६ आणि अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देईल. यानंतर बीसीबी त्याला हाय परफॉर्मन्स युनिटमध्ये बॅटिंग सल्लागार करण्याचा विचार करेल.'

४१ वर्षांचा वसीम जाफर बांगलादेशमध्ये युवा खेळाडूंसोबत ६ महिने घालवेल. जाफरने भारताकडून ३१ टेस्ट मॅचमध्ये १,९४४ रन केल्या. २ वनडे मॅचमध्येही जाफर भारताकडून खेळला.

स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवण्याचा रेकॉर्ड जाफरच्या नावावर आहे. जाफरने स्थानिक क्रिकेटमध्ये १५ हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. मागच्या २ रणजी मोसमात जाफर विदर्भाकडून खेळला. या दोन्ही मोसमात विदर्भाने २ रणजी ट्रॉफी आणि २ इराणी कप स्पर्धा जिंकल्या. 

Read More