Ind vs Eng Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात मॅंचेस्टरमध्ये झालेला चौथा कसोटी सामना ड्रॉ अर्थात अनिर्णीत राहिला. सामना ड्रॉ झाल्यानंतर भारतीय संघासाठी हा काहीसा दिलासादायक क्षण ठरला होता. मात्र, या आनंदावर काही वेळातच विरजण पडले. या मालिकेतील सर्वात प्रभावी खेळाडू पाचव्या आणि अखेरच्या टेस्टमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने मध्यरात्री ‘एक्स’वर ही माहिती शेअर केली आणि पाचव्या टेस्टसाठी एक नवा संघ जाहीर केला आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, मॅंचेस्टर टेस्टदरम्यान ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. स्कॅन रिपोर्टमध्ये फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम पंतच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, निवड समितीने पंतच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक एन. जगदीशनला संघात घेतले आहे.
31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सुरू होणाऱ्या निर्णायक पाचव्या कसोटीकरिता बीसीसीआयने संघात थोडे बदल करत नवीन टीम जाहीर केली आहे.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीशन (यष्टीरक्षक).
या मालिकेत ऋषभ पंतने आपल्या बॅटिंगने कमाल केली होती. ४ कसोटीत ७ डावांत त्याने ६८.४२ च्या सरासरीने आणि ७७.६३ च्या स्ट्राइक रेटने एकूण ४७९ धावा केल्या. यात त्याचे २ शतकं आणि ३ अर्धशतकं समाविष्ट आहेत. तो मालिकेतील सध्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मॅंचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात बॅटिंग करताना त्याच्या पंजाला जोरदार मार बसला होता. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र संघाला गरज असताना त्याने पुन्हा मैदानात येऊन अर्धशतक पूर्ण करत लढवय्या वृत्ती दाखवली.
— BCCI (@BCCI) July 27, 2025
Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury; N Jagadeesan named replacement.
All The Details #TeamIndia | #ENGvIND
भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवणाऱ्या पंतची अनुपस्थिती टीमसाठी मोठा धक्का असणार आहे. आता एन जगदीशनला संधी मिळाली आहे. तो ही संधी किती उपयोगात आणतो ते पाहावे लागेल.