Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS ENG Test : BCCI टीम इंडियात अचानक करणार बदल? गंभीरच्या लाडक्या वेगवान गोलंदाजाला मिळणार संधी?

IND VS ENG Test : पहिला सामना यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून हा सामना सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असताना बीसीसीआय भारताच्या टेस्ट संघात बदल करू शकते. भारतीय संघात एका धाकडं गोलंदाजांची एंट्री होऊ शकते, जो भारतीय ए संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा सुद्धा भाग होता. 

IND VS ENG Test : BCCI टीम इंडियात अचानक करणार बदल? गंभीरच्या लाडक्या वेगवान गोलंदाजाला मिळणार संधी?

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 20 जून पासून 5 सामन्यांची टेस्ट सीरीज खेळवली जाणार आहे. भारतीय संघ (Team India) सध्या 18 खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिला सामना यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून हा सामना सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असताना बीसीसीआय भारताच्या टेस्ट संघात बदल करू शकते. भारतीय संघात एका धाकडं गोलंदाजांची एंट्री होऊ शकते, जो भारतीय ए संघाच्या इंग्लंड दौऱ्याचा सुद्धा भाग होता. 

भारताचा पुरुष क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी इंडिया ए संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. येथे इंडिया ए संघाने इंग्लंड लायन्स सोबत दोन वॉर्म-अप सामने खेळले. इंडिया ए आणि टीम इंडियाच्या इंट्रा स्क्वॉड संघामध्ये सामना देखील खेळवण्यात आला. इंडिया ए संघात सरफराज खान, ऋतुराज गायकवाड़, अंशुल कंबोज, खलील अहमद आणि हर्षित राणा सारखे खेळाडू होते. 

रेवस्पोर्ट्जच्या एका रिपोर्टनुसार इंडिया ए संघाचा भाग असणाऱ्या हर्षित राणाचा इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजच्या मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. राणाने इंग्लंड लायन्सच्या विरुद्ध  एक वॉर्म-अप सामना खेळला असून या दरम्यान त्याने एक विकेट सुद्धा घेतली. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे वेगवान गोलंदाज आहेत. हर्षित राणाने 2024 -25 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हर्षित राणा हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. गौतम गंभीर हा केकेआरचा माजी मेंटॉर आहे. 

18 वर्षात भारताने इंग्लंडमध्ये जिंकली नाही सीरिज : 

भारतीय संघाने मागच्या 18 वर्षात इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. भारतीय संघाने शेवटची टेस्ट सीरिज इंग्लंडमध्ये 2007 मध्ये जिंकली होती. त्यावेळी भारताचा टेस्ट कर्णधार राहुल द्रविड होता. 

हेही वाचा : गौतम गंभीर पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही? BCCI कडून समोर आली महत्वाची माहिती

 

इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More