भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जॉब करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये भारताचे वरिष्ठ संघ (पुरुष आणि महिला), भारत अ, अंडर-23, अंडर-19, अंडर-16 आणि 15 वर्षांखालील संघ आणि सेंटर ऑफ एक्सलन्स येथे राज्य संघटनांचे प्रशिक्षण घेणारे खेळाडू यांचा समावेश आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. स्पिन बॉलिंग प्रशिक्षक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचा प्लॅन करण्यासाठी आणि खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करेल. हा प्रशिक्षण सेंटर ऑफ एक्सलन्समधील क्रिकेटच्या प्रमुखांशी जवळून काम करेल, असे बीसीसीआयने एका प्रकाशनात म्हटले आहे.
हे ही वाचा: IPL 2025: सामन्यानंतर गोलंदाजांना का दिले जात आहे रोपटं? कारण जाणून वाटेल आश्चर्य
प्रेस रिलीझमध्ये असे लिहिले आहे की, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्यांच्या बेंगळुरू येथील अत्याधुनिक BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) येथे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवत आहे. ही भूमिका वरिष्ठ भारतीय संघांसाठी (पुरुष आणि महिला) आहे, , भारत अ, अंडर-23, अंडर-19, अंडर-16 आणि 15 वर्षांखालील संघ आणि BCCI CoE येथे प्रशिक्षण घेणारे राज्य असोसिएशन खेळाडूंसह सर्व फॉरमॅट आणि वयोगटांमधील भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या प्रतिभेच्या विकासासाठी आणि कामगिरी वाढीसाठी अविभाज्य आहे."