Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टीम इंडिया बांगलादेशला जाणार नाही? BCCI कडून भारत सरकारची मनधरणी

IND VS BAN : बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने म्हटलं की, बीसीसीआय बांगलादेश विरुद्ध आगामी टी 20 आणि वनडे सीरिजसंदर्भात सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे. 

टीम इंडिया बांगलादेशला जाणार नाही? BCCI कडून भारत सरकारची मनधरणी

IND VS BAN : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) 17 ऑगस्टपासून तीन वनडे आणि तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करायचा आहे. परंतू दोन्ही देशांमधील राजकीयस्थिती पाहून हा दौरा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहेत. बांग्लादेश क्रिकेट बोर्डने (BCB) भारताच्या या दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लामने म्हटलं की, बीसीसीआय (BCCI) बांगलादेश विरुद्ध आगामी टी 20 आणि वनडे सीरिजसंदर्भात सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे. अमीनुल इस्लामला अशी आशा आहे की ऑगस्टमध्ये ते भारता विरुद्ध सीरिजचे आयोजन करू शकले नाहीत तरी ते भविष्यात मोठ्या संघांविरुद्ध सीरिजचे आयोजन नक्कीच करतील.  

30 जून रोजी शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर 19 व्या बोर्ड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी BCB चे अध्यक्ष अमीनुल इस्लामने मीडियाशी बोलताना म्हटले, 'आपली बीसीसीआय सोबत सकारात्मक बोलणी सुरु आहे. हे गरजेचं नाही की आम्ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येच सीरिज करू. आम्ही याविषयी बोलणी करतोय की या सीरिजचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं. जर आता शक्य नसेल तर आम्ही थोड्या कालावधीनंतर याचं आयोजन करू. बीसीसीआय आपल्या सरकारकडून परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. 

2024 मध्ये झाली होती शेवटची टी-20 सीरीज : 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणारी ही टी 20 सीरिज पहिली टी 20 सीरिज ठरली असती ज्यात भारतीय संघ बांगलादेशमध्ये जाऊन सामने खेळणार होता. दोन्ही संघांमध्ये मागच्यावर्षी 2024 मध्ये तीन सामन्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात आली होती. यावेळी बांगलादेशच्या संघाने भारताचा दौरा केला होता. यात भारताचा 3-0 ने विजय झाला होता. 

हेही वाचा : IND vs ENG: अचानक दुसऱ्या टेस्टमधून बाहेर पडला वेगवान गोलंदाज, मोठं कारण आलं समोर, प्लेईंग 11 ची घोषणा

 

भारत विरुद्ध बांग्लादेश वनडे सामन्याचं वेळापत्रक : 

पहिला वनडे सामना – 17 ऑगस्ट, मीरपुर
दुसरा वनडे सामना– 20 ऑगस्ट, मीरपुर
तिसरा वनडे सामना– 23 ऑगस्ट, चटगांव

भारत विरुद्ध बांग्लादेश टी 20 सीरिजचं वेळापत्रक : 

पहिला टी 20 सामना – 26 ऑगस्ट, चटगांव
दुसरा टी 20 सामना – 29 ऑगस्ट, मीरपुर
तिसरा टी 20 सामना – 31 ऑगस्ट, मीरपुर

Read More