Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDvsPAK : Hina Khan कडून मॅच सुरु होण्याआधीच जिंकल्याची पार्टी, कारण...

 टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

 INDvsPAK :  Hina Khan कडून मॅच सुरु होण्याआधीच जिंकल्याची पार्टी, कारण...

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल प्रतिक्रिया देत असते. आयसीसी टी -20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीपूर्वी हिना खान उत्साही दिसत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट याची साक्ष देत आहे.

या सामन्याबद्दल हिना खान खूप उत्साहित 

व्हिडिओमध्ये हिना खान सोफ्यावर बसून फ्रिजमधून स्नॅक्स आणि ज्यूस काढताना दिसत आहे. तिने तिच्या दोन्ही गालावर तिरंग्याचे रंग लावले आहेत. आणि ती या सामन्यासाठी खूप उत्साही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिला भारताच्या विजयाबद्दल किती विश्वास आहे याचा अंदाज येतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये हिना खानने टीव्हीचा रिमोटही आपल्याकडे ठेवला आहे जेणेकरून कोणीही चॅनेल बदलू नये. मॅच पाहताना हिना खान जोरजोरात ओरडताना दिसत आहे. चाहत्यांना हिना खानची ही स्टाईल खूप आवडत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना खान अलीकडेच रिअ‍ॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये दिसली होती. शोमध्ये अफसानाने तिची खिल्ली उडवली होती.

Read More