Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराटच्या या फोटोवर 'बेन स्टोक्स'चं मजेदार उत्तर

बेन स्टोक्सचं मजेदार उत्तर...

विराटच्या या फोटोवर 'बेन स्टोक्स'चं मजेदार उत्तर

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर कधी-कधी फार आक्रमक असतो. मैदानावर त्याचा आक्रमकपणा इतर देशाच्या खेळाडूंनी देखील अनुभवला आहे. कोहलीचा एका फोटो क्रिकइन्फोने ट्विट केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली फोनवर बोलताना दिसत आहे.

क्रिकइन्फोने हा फोटो ट्विट करत म्हटलं की, विराट काय बोलत आहे. यावर इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्सने खूप मजेदार उत्तर दिलं आहे. स्टोक्स म्हणतो की, तो नक्कीच माझं नाव घेत असेल.

२८ वर्षाचा इंग्लिश ऑलराउंडर बेन स्टोकने ट्विट करत म्हटलं आहे की, 'बेन स्टोक्स, जर तुम्हाला माहित आहे तर माहित आहे. (if you know you know)'. स्टोक्सच्या या उत्तराला ९ हजाराहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. यानंतर वेगवेगळे मीम देखील शेअर होत आहे.

इंग्लंडटी टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. इंग्लंडने ४ सामन्यांच्या टेस्ट सीरीजमध्ये आफ्रिकेवर ३-१ ने शानदार विजय मिळवला आहे. स्टोक्सने चौथ्या टेस्टमध्ये ४ विकेट घेतले होते.

Read More