Cricket News : क्रिकेट विश्वातून शुक्रवारी एक दुःखद बातमी समोर आली. 22 वर्षीय युवा क्रिकेटर जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या क्रिकेटरचं नाव प्रियजित घोष असं असून ती बंगालचा राहणार होता. बंगालसाठी रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्याचे स्वप्न तो पाहत होता. मात्र त्याच हे स्वप्न मात्र अधुरच राहिलं.
प्रियजित हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील राहणार होता. लहानपणापासून तो क्रिकेटचं प्रशिक्षण घेत होता. रणजी ट्रॉफीमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचं आणि भारतीय संघात स्थान मिळवायचे हे त्याचं स्वप्न होतं. शुक्रवारी 1 ऑगस्टला प्रियजित बोलपूरच्या मिशन कंपाऊंड परिसरातील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. खेळाडू असल्यानं तो स्वतःच्या फिटनेसकडे अधिक लक्ष द्यायचा. जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याची तब्येत खूपच बिघडली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि युवा क्रिकेटरने हॉस्पिटमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने बंगालच्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : Asia Cup: भारत पाकिस्तान सामना होणारच! ACC ने जाहीर केली तारीख, 'या' दिवशी दोन्ही संघ भिडणार
Priyojit Ghosh - a talented cricketer hailing from Bengal aged 22 has passed away suffering a cardiac arrest today.
Saptak Sanyal (SanyalwithStats) August 1, 2025
Priyojit was a resident of Bolpur, Birbhum district of WB. He was the highest run getter in U-16 CAB district cricket in the 2016-17 season.
We mourn the loss of pic.twitter.com/mm16lM6N61
बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. 2018 -19 मधील जिल्हास्तरीय 16 वर्षांखालील स्पर्धेत प्रियजित घोषने सर्वाधिक धावा केल्या होत्या. बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्याला सन्मानित केले होते. प्रियजीत त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात एका युवा खेळाडूला सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. आता बंगालमधून सुद्धा युवा क्रिकेटरच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जातेय.