Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बंगळुरू चेंगराचेंगरीला RCB च जबाबदार, क्रिमिनल केस चालवण्यासाठी मिळाला हिरवा झेंडा

कर्नाटक कॅबिनेटने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघावर क्रिमिनल केस चालवण्यास मंजुरी दिली आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरीला RCB च जबाबदार, क्रिमिनल केस चालवण्यासाठी मिळाला हिरवा झेंडा

Bengluru Stampede : बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 11 जणांनी आपला जीव गमावला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकल्यावर काढलेल्या या विजयी मिरवणुकीत ही दुर्घटना घडली होती. या प्रकरणात कर्नाटक सरकारने एक रिपोर्ट जाहीर केली असून यात चेंगराचेंगरीला आरसीबी फ्रेंचायझीला सदर प्रकरणात जबाबदार धरण्यात आलेलं आहे. यात विराट कोहलीचा (Virat Kohli) सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. कर्नाटक कॅबिनेटने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघावर क्रिमिनल केस चालवण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय जस्टिस मायकल डी’कुन्हा आयोगचा अंतिम रिपोर्ट आल्यावर दिला गेलाय. 

मंत्रिमंडळच्या बैठकीत या रिपोर्टला सर्व संमतीने स्वीकार कार्नाय्त आला आणि याच आधारे आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघावर क्रिमिनल केस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा प्रशासन आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहेत.

जस्टिस मायकल डी’कुन्हा आयोगाच्या रिपोर्टनुसार 11 जुलै रोजी मुख्यमंत्री सिद्धारमैयांना सोवण्यात आली होती, कर्नाटक राज्य क्रिकेट संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, इव्हेंट आयोजक डीएनए एंटरटेनमेंट आणि बेंगलुरु पोलीस 4 जून रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीला सरळ सरळ जबाबदार आहेत. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिकजण जखमी झाले. 

हेही वाचा : जसप्रीत बुमराह चौथी टेस्ट मॅच खेळणार की नाही? मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय

 

सेवानिवृत्त न्यायमूर्ती जॉन मायकेल डि'कुन्हा यांच्या नेतृत्वात सदस्याच्या चौकशीत असे आढळले की सर्व संबंधित पक्षांनी गर्दी सुरक्षितपणे हाताळणे अशक्य होईल हे माहित असताना सुद्धा हा कार्यक्रम घेतला. अहवालात सर्व पक्षांकडून 'गंभीर दुर्लक्ष आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष' झाले. आयपीएल विजयी संघाची झलक मिळण्याच्या आशेने शेकडो आरसीबी चाहते स्टेडियमच्या बाहेर जमले होते. कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात आयपीएस अधिकारी विकास कुमार विकास यांच्या निलंबन योग्य ठरवले आणि आयपीएलच्या विजयाच्या उत्सवाच्या तयारीत पोलिस अधिकारी आणि त्याचे सहकारी आरसीबीच्या नोकरांप्रमाणे काम करत होते असा युक्तिवाद केला. चार जून दरम्यान झालेल्या या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. 

 

Read More