Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाच्या 'स्विंग बादशाह'ने उडवली खळबळ; कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलं!

Bhuvneshwar Kumar News: भुवनेश्वर कुमारने धक्कादायक निर्णय घेतल्याने आता टीम इंडियात तसेच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार...

Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाच्या 'स्विंग बादशाह'ने उडवली खळबळ; कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलं!

Bhuvneshwar Kumar Change Instagram bio: तोंडावर आलेल्या आशिया कप ( Asia Cup 2023 ) आणि वर्ल्ड कपसाठी ( World Cup 2023 ) टीम इंडिया जोरदार तयारीला लागली आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार असल्याने आता टीम इंडियाकडून ( Team India ) मोठ्या आशा असणार आहेत. अशातच आता टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी असल्याने मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलंय. अशातच आता भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्विंग बादशाह म्हटल्या जाणाऱ्या भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

भुवनेश्वर कुमारने धक्कादायक निर्णय घेतल्याने आता टीम इंडियात तसेच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार, भुवनेश्वर कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये काही बदल केले आहेत. ज्यामध्ये, त्याने इंडियन क्रिकेटर ( Indian cricketer ) शब्दापैकी क्रिकेटर ( Cricketer ) शब्द हटवून फक्त इंडियन शब्द ठेवला आहे. त्यामुळे आता भुवी निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

सध्या चालू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भुवनेश्वर कुमारचं नाव घेतलं गेलं नाही. असं असताना देखील, भुवनेश्वर कुमार शुक्रवारी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, आता टीम इंडियातून डावलण्यात आल्याने आता भुवनेश्वर टोकाचा निर्णय घेतोय का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

मेरठमध्ये जन्मलेल्या 33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंड विरुद्ध नेपियरमधील मॅक्लीन पार्क येथे टी-20 सामन्यादरम्यान भारताकडून शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात संधीच मिळाली नाही. ज्यामुळे त्याच्या भविष्याबद्दल अटकळ निर्माण झाली आहे. त्यानंतर आता भुवी कोणता निर्णय घेणार, हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा - Suryakumar Supla Shot: सूर्याच्या 'सुपला शॉट' पाहून बॉलर आवाक्... एकच मारला पण सॉलिड मारला; पाहा Video

दरम्यान, 25 डिसेंबर 2012 रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू येथे टी-20 सामन्यादरम्यान सनसनाटी पदार्पण केल्यापासून तो टीम इंडियात सातत्य दाखवत होता. आतापर्यंत 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी-20 सामने खेळले आहे. टीम इंडियाच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या योजनांमध्ये आणि आशियाई खेळांसाठी देखील भुवीचं सिलेक्शन झालं नव्हतं. 

Read More