Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या फलंदाजाकडे सोपवलं नेतृत्व

Mumbai Indians New Captain: वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या फलंदाजाकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 

मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या फलंदाजाकडे सोपवलं नेतृत्व

Mumbai Indians New Captain Nicolas Pooran: मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यात भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, पीयूष जयस्वाल यांचा तर ग्लेन मॅक्सवेल, हेन्रीचं क्लासेन आणि निकोलस पूरन यांचाही समावेश आहे. आता वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या फलंदाजाकडे मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 

वेस्टइंडीजचा माजी फलंदाज आणि विकेटकिपर निकोलस पूरन याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता पूरनला मेजर लीग क्रिकेट सीजन 2025 मध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. 

10 जून रोजी केली निवृत्तीची घोषणा : 

वेस्टइंडीजचा विस्फोटक फलंदाज आणि विकेटकिपर निकोलस पूरनने 10 जून मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने सोशल मीडियावर याची घोषणा करून फॅन्सना धक्का दिला होता. 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने निकोलस पूरनचे फॅन्स आश्चर्यचकित झाले होते. त्याने त्याच्या या निर्णयामागचे कारण स्पष्ट केलं नव्हतं पण जगभरातील टी-20 लीगवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला असावा असे सांगतले जात होते. 

MI न्यूयॉर्कने बनवलं कर्णधार : 

निवृत्तीच्य फक्त एक दिवसानंतर निकोलस पूरनला मेजर लीग क्रिकेटच्या 2025 सीजनसाठी मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने आपला कर्णधार बनवलं आहे. एमआय न्यूयॉर्कने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहून याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले, 'एक नवीन कमांडर शहरात आला आहे - कॅप्टन निकोलस पूरन.' 2023 एमएलसीच्या फायनलमध्ये निकोलस पूरनने MI न्यूयॉर्कसाठी तब्बल 137 धावांची वादळी खेळी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

Read More