Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बिल गेट्सने सचिन तेंडुलकर सोबत घेतला वडापावचा आस्वाद, क्रिकेट आणि टेकची जुगलबंदी पाहिलीत का?

 भारतात येऊन बिल गेट्स विविध क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेत असून सध्या त्यांचा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर सोबतच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर आणि बिल गेट्स हे दोघे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ वडापावचा आस्वाद घेताना दिसतायत. 

बिल गेट्सने सचिन तेंडुलकर सोबत घेतला वडापावचा आस्वाद, क्रिकेट आणि टेकची जुगलबंदी पाहिलीत का?

Cricket : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध व्यावसायिक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात येऊन बिल गेट्स विविध क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेत असून सध्या त्यांचा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबतच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर आणि बिल गेट्स (Bill Gates) हे दोघे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ वडापावचा आस्वाद घेताना दिसतायत. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर "A snack break before we get to work" हे कॅप्शन देण्यात आलं आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये बिल गेट्स आणि सचिन तेंडुलकर हे दोघे एका बेंचवर बसून महाराष्ट्रातील लोकप्रिय स्ट्रीट फूड वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत. व्हिडीओच्या अंती "Serving soon" असं लिहिण्यात आलंय. ज्यामुळे कळून येतंय की यापुढे देखील काही तरी खास गोष्टी समोर येणार आहेत. बिल गेट्सने त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या भारत दौऱ्याविषयी बोलताना म्हटले की, 'मी इथून नवे विचार घेऊन परतणार आहे. भारतात खूप प्रतिभाशाली आणि महत्वाकांक्षी लोक आहेत. जे जगातील कोणत्याही समस्येवर रचनात्मक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतील. 

हेही वाचा : क्रीडा क्षेत्रातील सर्वात महागडा घटस्फोट, खेळाडूने पत्नीला पोटगीत दिले 14500000000 रुपये

 

बिल गेट्स आणि सचिन तेंडुलकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना आता बिल गेट्स आणि सचिनच्या संपूर्ण मुलाखतीच्या व्हिडीओची प्रतीक्षा आहे. दोन दिग्गजांमध्ये क्रिकेट आणि टेक जगतातील दोन दिग्गजांमध्ये नेमकं काय बोलणं झालं असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

सचिन तेंडुलकरची कारकीर्द : 

सचिन तेंडुलकरला त्याच्या फॅन्सनी 'गॉड ऑफ क्रिकेट' असे नाव दिले आहे. आजही टेस्ट आणि वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा  बनवण्याचा रेकॉर्ड हा सचिनच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतक केली आहेत. सचिनने १६ वर्षांचा असताना 15 नोव्हेंबर 1989 रोजी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर वनडेत 18 डिसेंबर 1989 रोजी सचिनचे पदार्पण झाले. 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिनने एकूण 34,357 धावा केल्या. 

Read More