WI VS AUS Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट जॉर्जमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मैदानात काळ्या रंगाचा भटका कुत्रा धावत मैदानात आला आणि सामना सुरु असताना मैदानात इतरत्र पळू लागला. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची आहे, जेव्हा जोश हेजलवुडने 33 व्या ओव्हरला वेस्टइंडीजला झटका दिला. आणि स्कोअर 124/4 झाला होता.
सामना सुरु असताना भर मैदानात कुत्रा इकडे तिकडे पाळायला लागला आणि मग जाऊन डीप कवरमध्ये बसला. जसं तो फिल्डिंग करायलाचं आला होता. खेळाडूंनी कुत्र्याला तेथून पळवण्याचा प्रयत्न केला पण तो तेथून जाण्याचं नावाचं घेत नव्हता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि हेजलवुडने सुद्धा कुत्र्याला तेथून हटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही. अखेर ब्रॉडकास्टरने मैदानात ड्रोन बोलवलं त्यानंतर कुत्रा मैदानाबाहेर पडला.
A brief intrusion by a furry friend
Windies Cricket (windiescricket) July 4, 2025
WI 124/4 (33) WIvAUS | FullAhEnergy pic.twitter.com/mZpN0PcGnS
वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डने शुद्ध यावर एक प्रतिक्रिया देत ट्विट केलं. ते व्हिडीओखाली कॅप्शन लिहित म्हणाले की, 'एक गोड पाहुणा आला होता' . मजेची गोष्ट ही की त्यानंतर ब्रैंडन किंग आणि शाई होपने वेस्ट इंडिजसाठी मोठी खेळी केली. त्यांनी 58 धावांची पार्टनरशिप केली. वेस्टइंडीजने पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 286 धावांसमोर 253 धावांची कामगिरी केली.
डॉग-ड्रामानंतर लगेचच हेझलवुडला ब्रॅंडन किंगने षटकार ठोकून योग्य उत्तर दिलं. या सामन्यात सेंट जॉर्जेस, ग्रेनेडा नेशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजसमोर 277 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरा दाखल वेस्ट इंडीज 34.3 षटकांत केवळ 143 धावा करू शकले. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे.