Pandya receives rousing reception from Mumbai Indians fans: मुंबई इंडियन्सच्या चाहते आता IPL 2024 च्या सिजनमधील निराशा मागे टाकून पुढे सरसावले आहे. यंदाच्या सिजनमध्ये (IPL 2025) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याचे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले. जेव्हा हार्दिक नाणेफेकीसाठी आला तेव्हा लोकांनी खूप चिअर केले. याशिवाय जेव्हा तो कॉमेंट्रीटर रवी शास्त्रीच्या प्रश्नांना उत्तरे देत होता तेव्हा मुंबई इंडियन्सच्या चाहते हार्दिकचा जयजयकार करताना दिसले.
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी दिलेल्या या सपोर्टमुळे हार्दिक पंड्याही खूश दिसत होता. या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिकसाठी या आधीचा सीझन खूप वाईट गेला. मुंबईने आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही आणि त्यांनी हार्दिकला खूप ट्रोल केले होते.
यावर्षी हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना त्याला आणि टीमला खूप पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. हार्दिक म्हणाला होता की, "जेव्हा मी फलंदाजीला येईल तेव्हा, जेव्हा मी षटकार मारेल तेव्हा आणि विकेट घेईल तेव्हा माझ्यासाठी आणि संघाचा मोठ्याने जयघोष करा.
Toss @mipaltan elected to field against @KKRiders
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
Updates https://t.co/iEwchzEpDk#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/VqHjlTKB7o
हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची गेल्या सिजनमध्ये कामगिरी चांगली नव्हती. पाठच्या सिजनमध्ये टीम 14 पैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत 10व्या स्थानावर होता. खराब कामगिरीनंतरही हार्दिकला कर्णधारपद कायम ठेवण्यात आले. तावरूनही त्याला चाहत्यांनी ट्रोल केले होते. या सिजनमध्ये पहिला सामना हार्दिक खेळू शकला नाही कारण गेल्या मोसमात तीन सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. हार्दिकच्या जागी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सूर्यकुमार यादवने कर्णधारपद भूषवले. हार्दिकने पुन्हा गुजरात टायटन्सची कमान हाती घेतली. मुंबईने पहिले दोन सामने गमावले होते. मात्र अखेरीस घरच्या मैदानावर त्याने पहिला विजय मिळवला.