Mohammed Siraj Reel: इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत भारताने नाट्यमय विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार ठरला मोहम्मद सिराज हा खेळाडू. त्याने संपूर्ण सामना गाजवला, इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः हैराण केलं. पण मैदानात कमाल करणारा सिराज मैदानाबाहेर मात्र एका गोष्टीत ‘फेल’ ठरला. सामना संपल्यानंतर टीम इंडिया जल्लोषात होती. त्याच वेळी सिराजने अर्शदीप सिंहकडून सोशल मीडियावर पोस्टसाठी आयडिया विचारली आणि इथंच सगळा गोंधळ झाला. अर्शदीपनं दिलेलं उत्तर आणि दोघांमधील मजेशीर संवादाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून समजलं की सिराज हा सोशल मीडियावर रील बनवण्यात फेल ठरला.
मॅचदरम्यान, चौथ्या दिवशी सिराजकडून एक मोठी चूक झाली होती. त्याने हैरी ब्रूकचा सोपा झेल टाकला आणि त्याने शतकी खेळी केली. त्यामुळे तो क्षण सिराजसाठी ओझं झाला होता. पण पाचव्या दिवशी त्यांनीच सामना आपल्या हातात घेतला. त्यांनी 9 बळी घेत इंग्लंडला गुडघे टेकायला लावलं आणि सर्व शंका मिटवत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
सामन्यानंतरचा एक मजेशीर व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधतोय. अर्शदीपने सिराजला रील बनवण्याची आयडिया दिली आणि सिराजने विचारलं, "स्टोरी का पोस्ट?" त्यावर अर्शदीप थोडा हैराण झाला आणि हसत म्हणाला, "अरे भाई, रील! बॉलिंग सोडून बाकी सगळं शिकवावं लागतं तुला!" हा संवाद इतका गंमतीशीर होता की, नेटिझन्सनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आणि तो व्हिडीओ काही तासांतच तुफान व्हायरल झाला.
Absolutely taken by Siraj to make this video! #TeamIndia | #ENGvIND | @mdsirajofficial | @arshdeepsinghh pic.twitter.com/qeX2Xl0AQY
— BCCI (@BCCI) August 4, 2025
विजयानंतर सिराजने एक भावनिक खुलासा केला. तो म्हणाला, “मी जेव्हा सकाळी उठलो, तेव्हा मला खात्री होती की आज मी काहीतरी खास करणार. मी गूगलवरून ‘Believe’ असलेली एक फोटो शोधली आणि ती फोनच्या वॉलपेपरवर लावली. तीच माझी प्रेरणा बनली. झेल सुटला हे नक्कीच दुखावणारं होतं, पण त्यानंतर जे केलं त्याने सारं बदलून टाकलं.”