Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे....' माजी कर्णधार दीपक हुड्डाची पत्नी स्विटीचा गंभीर आरोप

Deepak Hooda And Sweety Boora : काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यातील दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला होता. आता स्विटी बुरा हिचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने पती दीपक हुड्डावर अनेक आरोप केले आहेत. 

'माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे....' माजी कर्णधार दीपक हुड्डाची पत्नी स्विटीचा गंभीर आरोप

Deepak Hooda And Sweety Boora : भारतीय पुरुष कबड्डी संघांचा माजी कर्णधार दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि त्याची पत्नी महिला बॉक्सर स्विटी बुरा (Sweety Boora) या दोघांच्या नात्यात सार काही आलबेल नाही. वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असल्याने स्विटी बुरा हिने दीपक हुड्डाला घटस्फोट देण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र तरीही दीपक हुड्डा आणि त्याच कुटुंब आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप स्विटी बुरा हिने केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यातील दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला होता. आता स्विटी बुरा हिचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिने पती दीपक हुड्डावर अनेक आरोप केले आहेत. 

स्विटी बुरा व्हिडीओमध्ये काय म्हणाली?

स्विटी बुरा हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला यात तिने पती दीपकवर अनेक गंभीर आरोप केले. ती म्हणाली, 'एसीपी हे सुद्धा दीपक सोबत मिळालेले आहेत. त्यांनी पोलीस स्थानकातील मारहाणीचा पूर्ण व्हिडीओ जाहीर केला नाही. त्यांनी काटछाट केलेला व्हिडीओ मीडियाला दिलेला आहे. या दरम्यान अनेक गोष्टी घडल्या पण त्याव्हिडीओमध्ये दाखवल्या गेल्या नाहीत. त्याने पोलीस स्थानकात असताना शिवीगाळ केली तसेच माझ्या चारित्र्याबाबत अनेक घाणेरड्या गोष्टी बोलल्या, तसेच त्याने मला जिवे मारण्याची सुद्धा धमकी दिली, जे ऐकून माझा संताप अनावर झाला. त्यावेळी मला पॅनिक अटॅक सुद्धा आला पण यातलं काहीच त्या व्हिडीओमध्ये दाखवलं गेलं नाही'. 

हेही वाचा : IPL मध्ये खेळाडूच नाही तर अंपायरही होतात मालामाल, एका मॅचसाठी मिळणारा पगार ऐकून बसेल धक्का

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट... : 

सोशल मीडियावर लाईव्ह येत स्विटी बुरा हिने म्हटले की, 'माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी त्याचे सर्व व्हिडीओ पाहिले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती जेव्हा मी त्याला मुलांसोबत पाहिलं. मी या सर्व गोष्टी कोर्टात सिद्ध करेन. मला या सर्व गोष्टी समोर आणायच्या नव्हत्या पण माझ्याकडे आता पर्याय नाहीये. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत मी त्या सिद्ध करेन की तो मला कोण कोणत्या गोष्टी करण्यासाठी जबरदस्ती करायचा'.  व्हिडीओमध्ये स्विटीने सांगितले की, 'मला फक्त दीपककडून घटस्फोट हवाय. मला त्याच्याकडून कोणतेही पैसे नकोय किंवा मालमत्ता सुद्धा नकोय, मला फक्त त्याच्याकडून घटस्फोट हवाय. माझे पैसे जे हुंड्यात देण्यात आले होते मी ते सुद्धा मागत नाहीये, तरीही मला त्याच्याकडून त्रास दिला जातोय'. 

तीन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न : 

स्वीटी आणि दीपकचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही वेळाने स्विटीने दीपकवर हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. तिने सांगितले की, लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर देऊनही दीपक तिला हुंड्यासाठी नेहमीच त्रास देत होता. दीपक हुड्डा हा भारतीय पुरुष कबड्डी संघाचा माजी कर्णधार असून स्विटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 

Read More