Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'ब्रेकअपनंतर...', ओव्हल विजयाच्या आनंदातही पहिल्या प्रेमाची आठवण, शुभमनसमोर सिराजने व्यक्त केले दुःख

Mohammed Siraj Breakup: सिराजने शेवटच्या डावात 104 धावा देऊन 5 बळी घेतले आणि 23 बळींसह मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.     

'ब्रेकअपनंतर...', ओव्हल विजयाच्या आनंदातही पहिल्या प्रेमाची आठवण, शुभमनसमोर सिराजने व्यक्त केले दुःख

Mohammed Siraj talked about his first love and breakup press conference: भारताने ओव्हल कसोटीत अविस्मरणीय विजय मिळवत पाचव्या कसोटीत इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. या सामन्याचा हिरो ठरला मोहम्मद सिराज! निर्णायक डावात त्याने एक-दोन नाही तर पाच विकेट्स घेतल्या. तो एकूण 23 विकेटसह संपूर्ण मालिकेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. पण त्याच्या या कामगिरीच्या मागे एक भावनिक संघर्ष आणि स्वतःशी केलेली लढाई होती ज्यात "Believe" हा त्याचा मंत्र त्याला उपयुक्त ठरला.

सिराजचं सेलिब्रेशन

गस एटकिन्सनचा स्टंप उडवताच, सिराजने क्रिस्टियानो रोनाल्डोप्रमाणे सेलिब्रेशन केलं. ही केवळ विकेट नव्हती, तर त्याच्या मेहनतीचं, संयमाचं आणि भावनिक प्रवासाचं प्रतीक होतं. भारताने सामना 6 धावांनी जिंकत मालिका 2-2 ने बरोबरीत रोखली.

हे ही वाचा: VIDEO: डोळ्यात अश्रू, गोंधळ, जल्लोष… 'ज्वालामुखी'सारखा फुटला गंभीर! तुम्ही कधी पाहिला नसेल असा अवतार

 

"हे नेहमी माझ्याच बाबतीत का?"

सुरुवातील लॉर्ड्स टेस्टमध्ये सिराजसाठी गोष्टी बऱ्या नव्हत्या. त्याने हैरी ब्रूकचा झेल घेतला होता, पण चुकून दोरीवर पाय ठेवत त्या चेंडूला षटकारात रूपांतर दिलं. ब्रूकने त्याच झेलामुळे 111 धावांची खेळी केली आणि भारताला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. पत्रकार परिषदेत सिराज म्हणाला, "नेहमी माझ्याच बाबतीत का असं होतं? पण कदाचित वरच्या शक्तीनं माझ्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलं असेल."

पहाटेचा 'Believe' मंत्र

पाचव्या दिवसासाठी तयारी करताना सिराजने सकाळी 6 वाजता उठून ‘गूगल’वरून एक प्रेरणादायक फोटो शोधला. तो होता रोनाल्डोचा, ज्यावर लिहिलं होतं Believe. तो फोटो त्यांनी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर लावला आणि त्याच विश्वासाने ते मैदानावर उतरले.

हे ही वाचा: 'सगळंच शिकवावं लागतं...' 9 विकेट घेणारा सिराज 'या' गोष्टीत मात्र साफ फेल! अर्शदीपने घेतली मज्जा; Viral Video

 

ब्रेकअप झालं, पण...

शुभमन गिलसमोर भावनिक होत सिराज म्हणाला, "ब्रेकअप झालं खरं, पण त्या नात्यातून एक गोष्ट शिकलो ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. आज मी खेळायला उतरलो, तो हाच विश्वास घेऊन." गिलने त्याचं बोलणं  ऐकून घेतलं आणि ते दोघं त्या क्षणात काहीशा शांततेत हरवले.

 

 

हे ही वाचा: ओव्हलवर रोहित शर्माला नाही तर 'या' व्यक्तीला दिली होती यशस्वीने फ्लाईंग किस! जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

 

DK भाई प्रश्न विचारत होते 

सामना संपल्यानंतरचा तो क्षण खूप भावनिक होता. पण ड्रेसिंग रूममध्ये एक गमतीशीर प्रसंग घडला. सिराज म्हणतो, "मी शेवटचा गडी बाद केल्यावर डोळे पाणावले होते. आणि तेवढ्यात DK भाई (दिनेश कार्तिक) आले आणि इंग्रजीत काहीतरी विचारायला लागले. तेव्हा मी मनात म्हटलं, 'अरे भाई, जरा थांबा तरी!" आणि हे सांगतानाच तिथे उपस्थित सर्वजण हसून लोटपोट झाले.

Read More