Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानातील रस्त्यांवर टीम इंडियाची जर्सी घालून निघाला विदेशी फॅन, लोकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन Video

दोन्ही देशांचे संघ जेव्हा जेव्हा एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात उतरतात, तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष त्या सामन्याकडे असतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांचे संबंध खूपच बिघडून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. 

पाकिस्तानातील रस्त्यांवर टीम इंडियाची जर्सी घालून निघाला विदेशी फॅन, लोकांनी दिली अशी रिअ‍ॅक्शन Video

Cricket News : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध हे नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. दोन्ही देशांचे संघ जेव्हा जेव्हा एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात उतरतात, तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष त्या सामन्याकडे असतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांचे संबंध खूपच बिघडून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अशातच सध्या एका विदेशी कॉन्टेन्ट क्रिएटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये विदेशी व्यक्ती पाकिस्तानातील लाहोरमध्ये टीम इंडियाची जर्सी घालून रस्त्यावर निघाला होता. यावेळी त्याला पाहून पाकिस्तानी लोकांनी कशी रिअ‍ॅक्शन दिली याचा व्हिडीओ समोर येत आहे. 

पाकिस्तानात घातली टीम इंडियाची जर्सी : 

भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटची किती क्रेज आहे हे पाहण्यासाठी एका ब्रिटिश कंटेंट क्रिएटरने एक व्हिडीओ बनवला. या कॉन्टेन्ट क्रिएटरचं नाव एलेक्स वेंडर्स असून त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो पाकिस्तानातील लाहोर शहराच्या रस्त्यांवर टीम इंडियाची जर्सी घालून फिरत होता. एलेक्स ने हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बनवला की पाकिस्तानी लोकं भारताची जर्सी पाहून कशी रिअ‍ॅक्शन देता. या व्हिडीओला तीन मिलियन व्यूज आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ब्रिटिश कॉन्टेन्ट क्रिएटरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा विदेशी व्यक्ती लाहोरच्या रस्त्यांवर टीम इंडियाची जर्सी घालून निघाला तेव्हा अनेक लोकं त्याला पाहून थक्क झाले. तसंच जेव्हा त्या कॉन्टेन्ट क्रिएटरने लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील लोकं त्याच्याशी अतिशय साधारणपणे बोलत होते.  त्यानं सांगितलं की पाकिस्तानात लोकांनी त्याला टीम इंडियाची जर्सी घालून फिरल्याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिली नाही. 

पाकिस्तान सामन्यापूर्वी मिळाली धमकी : 

भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी संघाला धमकी मिळाली होती. रोहितने जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की एक धमकी आली आहे, काही तरी सुरुये. त्यामुळे सामन्याच्या दोन दिवस आधी आम्हाला हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी नव्हतो. माहोल बनणं तिथेच सुरु झालं होतं. आम्ही जेवण ऑर्डर करायचो आणि हॉटेल पूर्ण भरलेलं होतं. चालणं सुद्धा अवघड झालं होतं. फॅन्स, मीडिया सगळेच तिथे होते. तेव्हाच तुम्हाला जाणीव होते की ही केवळ एक मॅच नाही तिथे काहीतरी खास होणार आहे. आम्ही जसं स्टेडियमच्या जवळ पोहोचलो तिथे पहिल्या पासूनच उत्सवाचा माहोल होता. भारतीय फॅन्स, पाकिस्तानी फॅन्स सर्व नाचत होते'. 

Read More