Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ब्रॉन स्ट्रेमॅन, केनची दांडी गूल; ब्रॉक लेस्नर ठरला WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयन

जगभरातील WWE चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला. ब्रॉन स्ट्रेमॅन आणि केनची दांडी गुल करत ब्रॉक लेस्नरने WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयनशीप किताबावर आपले नाव कोरले.

ब्रॉन स्ट्रेमॅन, केनची दांडी गूल; ब्रॉक लेस्नर ठरला WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयन

नवी दिल्ली : जगभरातील WWE चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला. ब्रॉन स्ट्रेमॅन आणि केनची दांडी गुल करत ब्रॉक लेस्नरने WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयनशीप किताबावर आपले नाव कोरले.

हा किताब सलग दुसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी लेस्नरने केली आहे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत सामना प्रचंड उत्सुकतेचा राहिला. या रोमांचक सामन्याची उत्कंटा क्षणाक्षणाला वाढत होती. सुरूवातीच्या काही मिनीटात सामना लेस्नरच्या हातून सुटतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण, काही क्षनातच बाजी पलटवत लेस्नरने सामन्यावर वर्चस्व मिळवले.

दरम्यान, सुरवातीला केनने लेस्नरला तडाखेबंद चोप दिला. त्यानंतर ब्रॉन स्ट्रेमॅनननेही लेस्नरवर जोरदार चढाई करत त्याला पार दुबळा करून टाकले. पण, काही वेळातच चवताळून उठलेल्या लेस्नरने केन आणि ब्रॉन स्ट्रेमॅनची जोरदार धुलाई करत सामना खिशात टाकला.

 

Read More