Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Captain Injury: तिसऱ्या T-20 सामन्यातून दुखापतीमुळे कर्णधार बाहेर; टीमला मोठा धक्का

Captain Injury: वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Captain Injury: तिसऱ्या T-20 सामन्यातून दुखापतीमुळे कर्णधार बाहेर; टीमला मोठा धक्का

Captain Injury: सध्या भारतात अफगाणिस्तान विरूद्ध टीम इंडिया अशी टी-20 सिरीज सुरु आहे. तर न्यूझीलंडमध्ये पाकिस्तान विरूद्ध किवी अशी टी-20 सिरीज खेळवली जातेय. टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने हा सिरीज महत्त्वाच्या मानल्या जातायत. वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. 

न्यूझीलंडची टीम पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 सिरीज खेळतेय. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 46 रन्सने आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात 21 रनने पराभव झाला. याच कारणामुळे पाकिस्तानी टीम सिरीजमध्ये 2-0 ने पिछाडीवर आहे. मात्र आता न्यूझीलंड टीमला मोठा धक्का बसला आहे. सिरीजमधील तिसऱ्या सामन्यातून कर्णधार केन विलियम्सन बाहेर पडला आहे. 

केन विलियम्सनला पुन्हा दुखापत

पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विलियम्सनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. या सामन्यात केनला हॅमस्ट्रिंगची समस्या त्रास देऊ लागली. दुखापत झाल्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला आणि पुन्हा मैदानात उतरलाच नाही. त्याच्या अनुपस्थितीत टीमच्या कर्णधारपदाची धुरा टीम साऊदीने सांभाळली. यानंतर केन विलियम्सन उर्वरित सिरीजमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 

'या' खेळाडूला मिळाली संधी

33 वर्षीय केन विलियम्सन तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार नाहीये. यावेळी तिसर्‍या टी 20 सामन्यात त्याच्या जागी जोश क्लार्कसन संधी देण्यात येणार होती. मात्र पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो आधीच बाहेर गेला होता. आता विल यंग विलियम्सनची जागा घेणार आहे. विल यंगने न्यूझीलंड टीमसाठी 14 टी-20 सामन्यांमध्ये 260 रन केल्या आहेत. मात्र कर्णधार विलियम्सनचं बाहेर पडणं न्यूझीलंडसाठी धक्क्यापेक्षा कमी मानलं जात नाहीये.

केन विलियम्सनच्या मागे दुखापतींचं ग्रहण

गेल्या वर्षभरापासून केनच्या मागे दुखापतींचा ससेमीरा मागे लागला आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात त्याचा गुडघ्याचा लिगामेंट दुखावला गेला होता. यानंतर त्याला बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं. २०२३ च्या वर्ल्डकपपूर्वी तो पूर्णपणे बरा झाला होता. वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. यानंतर त्याला चार सामन्यांसाठी बाहेर राहावे लागले. यानंतर डिसेंबरमध्ये बांगलादेशच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी टी-20 टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याला त्याचं नाव मागे घ्यावं लागलं. यानंतर आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झाली असून पाकिस्तानविरूद्धची उर्वरित सिरीज केन खेळू शकणार नाहीये.

Read More