Pat Cummins Leaving IPL 2025?: आयपीएल २०२५ चा हा सीजन खूपच चर्चेत आहे. दमदार सामने आणि खेळाडूंमुळे या सिजन्माला एक वेगळी ओळख मिळाली आहे. पण चालू सिजनमध्ये अपेक्षेप्रमाणे सनरायझर्स हैदराबादची कामगिरी आतापर्यंत अशी राहिलेली नाही. संघाच्या खराब कामगिरीदरम्यानचा आता , सध्याचा एसआरएच कर्णधार पॅट कमिन्सच्या पत्नीच्या एका पोस्ट ने प्रश्न निर्माण केले आहेत. पत्नी बेकी कमिन्सने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर ज्यामुळे खळबळ उडाली आहे. तिच्या या पोस्टमुळे कमिन्स भारत सोडून गेला का? तो सुरु असलेला सीजन सोडून मध्यात ऑस्ट्रेलियात परतेल का? असा अंदाज लोक लावू लागले.
खरं तर, बेकी कमिन्सने गेल्या शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्या पोस्टमुळे कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतणार असल्याची शक्यता बांधली जात आहे. बेकीने आपल्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर केला आणि कॅप्शन दिले, "अलविदा भारत. आम्हाला या देशात येऊन खूप आनंद झाला."
Pat Cummins wife on Instagram:
— Johns. (@CricCrazyJohns) April 18, 2025
"Goodbye India, we have loved visiting this beautiful country". pic.twitter.com/Zvn3cXH9tH
घोट्याच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर पॅट कमिन्स आयपीएल २०२५ मध्ये एसआरएच संघात सामील झाला. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. या कारणांमुळे कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतत आहे असा अंदाज चाहत्यांनी वर्तवायला सुरुवात केली आहे. पण आयबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही.
हे ही वाचा: अश्लील फोटो, शारीरिक संबंध... संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!
व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अधिक गोंधळ वाढला. तेवढ्यात बेकीने दुसऱ्या पोस्टद्वारे परिस्थिती स्पष्ट केली. ज्यामध्ये कमिन्स त्याची नवजात मुलगी 'एडी' सोबत स्विमिंग पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. या फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. यावरून हे सिद्ध होते की कमिन्स आयपीएल खेळत नाहीयेत पण दुसऱ्या भागापूर्वी स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी तो त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ काढत आहे.