Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कॅरोलिना वॉझनियाकी ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

डेन्मार्कच्या कॅरोलिना वॉझनियाकीनं ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटाकवलं. अंतिम सामन्यात वॉझनियाकीनं सिमोना हालेपचा तीन सेटमध्ये पराभव केला.

कॅरोलिना वॉझनियाकी ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

मेलबर्न : डेन्मार्कच्या कॅरोलिना वॉझनियाकीनं ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटाकवलं. अंतिम सामन्यात वॉझनियाकीनं सिमोना हालेपचा तीन सेटमध्ये पराभव केला.

पहिले-वहिले ग्रँडस्लॅम

वॉझिनियाकीनं 7-6, 3-6, 6-4 नं आपला अंतिम फेरीचा मुकाबला जिंकला. अतिशय रंगतदार अशा मुकाबल्यात वॉझिनियाकीनं बाजी मारत आपल्या टेनिस कारकीर्दीतील पहिल्या-वहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदालाही गवसणी घातली.

डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये अव्वल

या विजेपदासह वॉझनियाकी सोमवारी जाहीर होणा-या डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान होणार आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी 

दरम्यान, हालेपनं वॉझनियाकीला कडवी टक्कर दिली. मात्र, वॉझनियाकीनं तिला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही आणि अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी उंचावली. 

 

Read More