Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

15 महिन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं 51 वं शतक, सेंच्युरी ठोकल्यानंतर तो गळ्यातील लॉकेटचं का घेतो चुंबन?

रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताने पाकिस्तानला धुळ चारली. या सामन्यात विराट कोहलीने तब्बल 15 महिन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

15 महिन्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं 51 वं शतक, सेंच्युरी ठोकल्यानंतर तो गळ्यातील लॉकेटचं का घेतो चुंबन?

दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक झळकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात विराट कोहलीने 111 चेंडूत शतक ठोकलं. कोहलीने त्याच्या डावात 7 चौकार मारले. माजी कर्णधार विराट कोहलीचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे शतक आहे. या दिग्गज फलंदाजाने जवळजवळ 15 महिन्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. यापूर्वी, कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध 117 धावांची दमदार खेळी केली होती.

सेंच्युरी ठोकल्यानंतर लॉकेटचं का घेतो चुंबन?

तुम्ही एक गोष्ट पाहिले असेल जेव्हा जेव्हा विराट कोहली शतक ठोकतो, त्यानंतर गळ्यातील लॉकेट काढून त्याच चुंबन घेतो. याबद्दल  समालोचक हर्षा भोगले यांनी या लॉकेटबद्दलची खासियत सांगितली होती. हर्षा भोगले म्हणाले की, विराट कोहलीने गळ्यात घातलेले लॉकेट म्हणजे त्याचा लग्नाची अंगठी आहे. ते लॉकेटमध्ये विराट कोहलच्या प्रेमाचे प्रतीक आहे. शतक ठोकल्यानंतर विराट त्या लॉकेटचं चुंबन घेऊन पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मावरील प्रेम व्यक्त करतो. अनुष्का आणि विराटमधील प्रेम हे सगळी दुनिया वेळोवेळी पाहत असते. ती नेहमी कुठल्याही प्रसंगी त्याचासोबत खंबीरपणे उभी दिसते. अनेक सामन्यांदरम्यान त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती उपस्थितीत असते.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला आणि शुभमन गिलसह त्याने डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 75 चेंडूत 69 धावांची भागीदारी झाली. यानंतर, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 128 चेंडूत 114 धावांची भागीदारी केली. अय्यरने 67 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने भारतासाठी विजयी चार ठोकले आणि यासोबत त्याने त्याचे बहुप्रतिक्षित शतकही पूर्ण केलं. भारताला जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता होती आणि कोहलीने खुसदिलच्या चेंडूवर चौकार मारून 100 धावा पूर्ण केल्यासोबत भारताला विजयही मिळवून दिला. 

सर्वात जलद 14000 धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आज अजून एक रेकॉर्ड केला. 14 हजार धावा पूर्ण करुन तो तिसरा फलंदाज ठरलाय.  त्याने केवळ 287 डावांमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली. कोहलीने भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 350 डावांचा विक्रम मागे टाकला. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 378 डावांमध्ये 14000 धावा पूर्ण केल्या.

सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनलाय. तो एकूण यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 158 झेल घेतले आहेत.

एकदिवसीय सामन्यातील 51 वे शतक

रविवारी विराट कोहलीने त्याचे 51 वे एकदिवसीय शतक झळकावले. विराट कोहलीने जवळजवळ 15 महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. यापूर्वी, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते.

Read More